जळगाव- जिल्ह्यात तापमानाचा पारा ४३ अंशांपर्यत पोहोचला आहे. दिवसा उन्हाच्या झळा नागरिकांना घामाच्या धारांनी असह्य करीत आहेत. उन्हाळ्यात पाण्याचा अतिरिक्त उपसा होत असल्याने वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागातर्फे जानेवारीपासून पाणीपातळीचे निरीक्षण केले जाते. यंदा एप्रिलमध्ये चाळीसगाव, पारोळा, जामनेर, धरणगाव, एरंडोल, अमळनेर या सहा तालुक्यात पाऊण ते सव्वा मीटरपर्यंतची घट झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. दरम्यान, पाणीटंचाईच्या अनेक गावांत झळा बसण्यास सुरवात झाली आहे.