Chalisgaon News : अंधारी परिसरात होतेय सर्रास वृक्षतोड

परिसरात गेल्या काही दिवसांपासून हिरव्यागार डेरदार वृक्षांची सर्रास तोड होत आहे ; वन विभागाचे दुर्लक्ष
Chalisgaon News
Chalisgaon Newssakal
Updated on

अंधारी (ता. चाळीसगाव)- परिसरात गेल्या काही दिवसांपासून हिरव्यागार डेरदार वृक्षांची सर्रास तोड होत आहे. भर दिवसा तोड करुन ट्रॅक्टर व मॅटेडोरद्वारे लाकडांची वाहतूक केली जाते. येथील शेत रस्त्यांवरील झाडे अवैधरित्या तोडण्यात आल्याने हा संपूर्ण परिसर बोडका होण्याची भीती व्यक्त होत आहे. या वृक्षतोडीकडे वन विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com