गंगापूर धरणावरील त्या बोटीच्या शोध लागणार? 

gangapur dam.jpg
gangapur dam.jpg

नाशिक : राज्यात सत्तांतरानंतर कॉंग्रेस आघाडीच्या काळात तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या पण भाजपच्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत रखडलेल्या कामांना गती येण्याची आशा आहे. तत्कालीन इंडियाबुल्ससाठीच्या एकलहरे-सिन्नर रेल्वेमार्गासह गंगापूर धरणावरून गायब झालेल्या बोटीचा शोध सुरू होण्याची आशा आहे. 

रखडलेल्या एकलहरे सिन्नर रेल्वेप्रकल्पाबाबत आशा
कॉंग्रेस आघाडीच्या काळात नाशिकला मेगा पर्यटन संकुल उभारून बोट क्‍लब, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेंशन सेंटर, साहसी क्रीडासंकुल बांधणे, पर्यटक निवास संकुल (लेक व्ह्यू रिसोर्ट) विविध कामांचे फेब्रुवारी 2014 मध्ये अभिनेता सलमान खान, सुनील शेट्टी यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन झाले होते. तत्कालीन इंडियाबुल्स कंपनीसाठी एकलहरेहून सिन्नरमार्गे गुळवंचपर्यंतचा रेल्वे प्रकल्प रखडला आहे. भाजपच्या पाच वर्षांच्या काळात काहीही कामे झाली नाहीत. उलट अनेक महिने सडत पडलेल्या बोटी येथून गायब झाल्यामुळे पुन्हा सत्तेत आलेल्या कॉंग्रेस आघाडी सरकारकडून या बोटींचा शोध घेतला जाऊ शकतो. 

लेक व्हू नेचर्स रिसोर्ट 
गंगापूर धरणाच्या बॅक वॉटर भागात होणाऱ्या बोट क्‍लबमध्ये पर्यटक निवास संकुल व लेक व्ह्यू रिसोर्ट बांधण्यासाठी 70 कोटींच्या प्रकल्पासाठी केंद्राकडून 24 कोटींची रक्कम मंजुर झाली. लेक व्ह्यू नेचर्स रिसोर्टमध्ये द्राक्ष पर्यटनासह वाइनला पर्यटकांसाठी "लेक व्ह्यू नेचर्स रिसोर्ट' पर्यटक निवासात 110 कक्ष, उपाहारगृह, सभागृह, तरण तलाव, आयुर्वेदिक स्पा व मसाज केंद्र, वाइन टेस्टिंग केंद्र, द्राक्ष महोत्सवाच्या पायाभूत सुविधेसाठी 24 कोटी, तर केंद्राला 11 कोटींच्या मंजुरीला मान्यता मिळाली होती. 
 
साहसी क्रीडासंकुल 
गंगापूरच्या साहसी क्रीडा संकुलात प्रशासकीय इमारत, अभ्यागत कक्ष, इनडोअर क्रीडा इमारत बांधकाम, रॉक क्‍लायबिंग, सायकल ट्रॅक, घोडे सवारीसाठी पायाभूत सुविधा, आईस स्केटिंग, लहान मुलांसाठी खेळण्यास सुविधा, खुले उपाहारगृह लॉकर व चेजिंग रूम, सोवीनियर शॉप, स्वच्छतागृहासाठी 14 कोटींचा निधी केंद्राकडून मंजूर झाला होता. त्यानुसार अनेक वर्षे गंगापूर धरणावर बोटी तशाच पडून होत्या. कालांतराने त्या गायबही झाल्या. अशा गायब बोटींचा शोध सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

"त्या' प्रकल्पांना मिळणार संजीवनी 
गुळवंच (ता. सिन्नर) येथील तत्कालीन इंडियाबुल्सच्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पासाठी नाशिक रोडहून एकलहरे-सिन्नरमार्गे रेल्वेमार्गाच्या कामाला तेव्हाच सुरवात झाली. भूसंपादनाचे काम होऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. पण पाच वर्षे हा प्रकल्प तसाच रखडला. त्यामुळे कॉंग्रेस आघाडीच्या काळात तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून सुरू झालेले पण पाच वर्षे बंद राहिलेल्या प्रकल्पांना संजीवनी मिळण्याची आशा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com