Dhule : पोलिसपाटलांमुळे वाचले महिलेचे प्राण

felicitation of Police for saving woman's life. Mahendra Patil, Yogesh Patil Honored Citizen.
felicitation of Police for saving woman's life. Mahendra Patil, Yogesh Patil Honored Citizen.esakal

धुळे : तावखेडा (ता. शिंदखेडा) व सुखवद येथील पोलिसपाटलांनी प्रसंगावधान दाखविल्याने गिधाडे पुलावरून उडी मारण्याच्या प्रयत्नात (Attempt To suicide) असलेल्या एका महिलेचे प्राण वाचविण्यात त्यांना यश आले. (Woman who trying to suicide life saved by police Dhule Latest Marathi News)

तावखेडा येथील पोलिसपाटील डॉ. महेंद्र पाटील व सुखवद येथील पोलिसपाटील योगेश पाटील शेतीकामे आटोपून शिरपूर येथे आपल्या मुलाच्या शाळेत कामानिमित्त जात असताना, त्यांना दुपारी एकच्या सुमारास एक महिला गिधाडे पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न करताना दिसून आली.

प्रसंगावधान साधत त्यांनी गाडी थांबवून त्या महिलेला अडविले व समजूत काढण्याच्या प्रयत्न केला. संबंधित महिला शिंदखेडा येथील असल्याचे तिने सांगितले. महिलेला तीन मुले असल्याची माहितीही मिळाली. या घटनेची माहिती जवळचे ग्रामपंचायत सदस्य समाधान भिल यांना कळविली. ते तत्काळ घटनास्थळी आले.

शिंदखेड्याचे पोलिस निरीक्षक सुनील बाबड यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिस अधिकारीही तेथे हजर झाले. महिलेला पोलिस ठाण्यात आणले. तिच्या पती, सासू व मुलांना पोलिस ठाण्यात बोलावून तिला समज देण्याच्या प्रयत्न केला.

felicitation of Police for saving woman's life. Mahendra Patil, Yogesh Patil Honored Citizen.
Dhule : शिरपूर शहरात युवकाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

आत्महत्येने कुठलेच प्रश्न सुटत नाहीत, घरातील प्रश्न हे सामोपचाराने मिटवावे लागतात, असे म्हणत महिलेला समजावले व अशी घटना पुन्हा घडणार नाही, याबाबत महिलेकडून लेखी घेऊन पती व सासूला असा प्रकार घडणार नाही, याबाबत सूचना केली.

महिलेचे प्राण वाचविल्याबद्दल पोलिस निरीक्षक श्री. बाबड, दोंडाईचा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दुर्गेश तिवारी, शिवाजी पाटील, मनोहर पाटील, युवराज माळी, गणेश गिरासे, चरणसिंग गिरासे, भाऊ परदेशी आदींनी पोलिसपाटील डॉ. महेंद्र पाटील, योगेश पाटील यांचे कौतुक केले.

felicitation of Police for saving woman's life. Mahendra Patil, Yogesh Patil Honored Citizen.
मनपात ‘आओ-जाओ, घर तुम्हारा’; उपमहापौर, उपायुक्तांकडून कर्मचाऱ्यांची झाडाझडती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com