World Breastfeeding Week 2022 : आईच्या दुधामुळे बाळ हुशार, निरोगी

World Breastfeeding Week 2022 Dr. aradhana bhamre
World Breastfeeding Week 2022 Dr. aradhana bhamre esakal

धुळे : आईच्या दुधात असे गुण आहेत की ज्यामुळे बाळ हुशार, निरोगी आणि कणखर राहते. शिवाय आईचे दूध स्थूलपणा, डायबेटिस, दमा, पोटासह कानाचे इन्फेक्शन, सडन इन्फन्ट डेथ या सर्वांना प्रतिबंधक आहे.

अँटीबॉडीसने भरपूर अशा आईच्या दुधाने बाळाला त्याच्या वयाप्रमाणे योग्य ते पोषण मिळत असते, अशी माहिती राम हॉस्पिटलच्या स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. आराधना राहुल भामरे यांनी दिली. (World Breastfeeding Week 2022 Babies are smart healthy because of mother milk dr aradhana bhamre nashik Latest Marathi News)

सर्वत्र जागतिक स्तनपान सप्ताह सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. भामरे यांनी सांगितले, आईच्या दुधातील प्रथिने (प्रोटीन्स) गाईच्या दुधापेक्षा प्रमाणात असले तरी त्याचे गुणधर्म बाळाच्या वाढीसाठी योग्य आहेत.

त्यात लिऊसीन नामक अमिनो ॲसिडमुळे स्नायूंची वाढ होते. वासरू जन्मल्यापासून ४० दिवसात दुप्पट वजनाचे होते. कारण गायीच्या दुधात लिऊसीन जास्त आहे. बाळ वजन दुप्पट करण्यास १८० दिवस लावते.

कारण आईच्या दुधात लिऊसीन कमी असते. गाईच्या दुधावरची किंवा फॉर्मुला पावडरचे दूध पिणारी मुले गुटगुटीत वाटतात. लिऊसीनमुळे पुढे ही मुले स्थूल होतात. टाईप एक डायबेटीसला बळी पडतात.

आईच्या दुधात केसीन आणि व्हे प्रोटीनचे प्रमाण ४० : ६०, तर गाईच्या दुधात हेच प्रमाण ८०:२० असे आहे. केसीन पचायला जड असते, शिवाय त्याने भविष्यात टाईप एक डायबेटीस होण्याची शक्यता वाढते.

World Breastfeeding Week 2022 Dr. aradhana bhamre
Photo : भोलेनाथाच्या गजराने दणाणली अवघी नाशिक नगरी

गाईच्या दुधात कॅल्शियम चौपट जास्त असते. एवढे कॅल्शिअम आपल्या बाळाला पचत नाही आणि त्याची गरजही नाही. गाईच्या दुधात सोडियम, पोटॅशिअम, फॉस्फरस, क्लोराईड ही खनिजे तिप्पट असतात.

हे जास्तीचे ‘सोल्युट लोड’ बाळाच्या अपरिपक्व मूत्रपिंडांवर पडल्यामुळे त्याच्या शरीरातील पाणी बाहेर फेकले जाते, ज्याने डिहायड्रेशन होते. गाईच्या दुधात लोह, 'ड', 'क' व 'अ' ' जीवनसत्त्व खूप कमी असतात. ओमेगा ६ व ओमेगा ३ डीएचएमुळे बाळाच्या मेंदूची वाढ होते. ते गाईच्या दुधात नसतात.

या फॅट्समुळे बाळाची आकलनशक्ती आणि शारीरिक क्षमतेत वृद्धी होते. ही मुले मोठेपणी हुशार निघतात, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. सातव्या महिन्यात जन्मलेल्या बाळाच्या आईचे दूध किंवा सुरुवातीला आलेले दूध- कोलोस्ट्रम याला ‘लिक्विड गोल्ड’ म्हणतात. स्तनपानामुळे आईचे गर्भाशय आकुंचन पावते, प्रसूतीनंतरचा रक्तस्त्राव थांबतो, स्तन आणि बीजकोशीच्या कॅन्सरची शक्यता कमी होते.

असे असूनही पहिले सहा महिने फक्त स्तनपान करणे आणि त्यापुढे मुल दोन वर्षांचे होईपर्यंत स्तनपान चालू ठेवणे वाटते तितके सोपे नाही. यशस्वीरित्या स्तनपानासाठी बाळ जन्मल्यावर लगेच तासाच्या आत आईने दूध पाजले पाहिजे.

स्तनपान करण्यापूर्वी बाळाच्या जबड्याची योग्य पकड (लॅच) बसली पाहिजे, आईला पुरेपूर आराम आणि सकस आहार मिळाला पाहिजे. तिचे मानसिक स्वास्थ्य जपले पाहिजे. बाळाला हवे असेल तेव्हा आणि हवे असेल तिथे स्तनपानाची मुभा असली पाहिजे. सततचे जागरण, दुपटी बदलणे, घरकामाचा व्याप, बाळाची काळजी, मोठ्या मुलांची कामे आदी जबाबदाऱ्या वाढल्या की त्याचा दुधावर परिणाम होऊ लागतो.

डब्लूएचओच्या सर्वेक्षणानुसार अमेरिका, भारतासह संपूर्ण जगातील दर तीन बालकांमागे दोन बालकांना आयुष्यातले पहिले सहा महीने संपूर्ण स्तनपान मिळत नाही. त्यामुळे या वर्षी जागतिक स्तनपान सप्ताह २०२२ या कालावधीपासून जगाच्या अजेंड्यावर आहे, असे डॉ. भामरे यांनी सांगितले.

World Breastfeeding Week 2022 Dr. aradhana bhamre
धुळे : तावखेड्याचा काय रस्ता, काय तो चिखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com