esakal | नानासाहेब कुर्‍हाडेंच्या पुस्तकांचा येवल्यात प्रकाशन सोहळा
sakal

बोलून बातमी शोधा

books

नानासाहेब कुर्‍हाडेंच्या पुस्तकांचा येवल्यात प्रकाशन सोहळा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

येवला- प्राथमिक शिक्षक म्हटलं की चौफेर अभ्यास असलेले व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येते. ज्ञानार्जन करतांना अनेक पैलूंचा अभ्यास करून इतरांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल असा पुस्तक लेखनाचा सुंदर प्रयत्न येथील उपक्रमशील शिक्षक नानासाहेब कुऱ्हाडे यांनी केला आहे. शिक्षण, बालपण, शाळाप्रवेश, शिक्षणातील विविध स्थित्यंतरे, सकारात्मक विचार, अपंग समावेशित शिक्षण अशा विविध विषयांचा आढावा घेणारे शिक्षणप्रवाह व दृष्टिकोन ही दोन पुस्तके वाचकांपुढे येत आहे.

तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांमधून प्रथमच एकावेळी दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा शहरातील महात्मा फुले नाट्यगृह येथे मंगळवारी (ता.२७ ) मार्च रोजी पार पडणार आहे. पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश चिटणीस ऍड. माणिकराव शिंदे हे असणार आहे. शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव व सहाय्यक उपसंचालक दिलीप गोविंद यांच्या हस्ते दोन्ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे.

प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार मारुतीराव पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते अंबादास बनकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे, माजी सभापती संभाजी पवार, सभापती आशा साळवे, उपसभापती रुपचंद भागवत, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सुरज पटनी, भुजबळाचे स्विय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, बी. आर. लोंढे, विशेष कार्य. अधिकारी रविंद्रसिंह परदेशी, जेष्ठ साहित्यिक गो. तु. पाटील, शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झणकर, नितीन बच्छाव, शिवनाथ मंडलिक, उपशिक्षणाधिकारी एल. डी. सोनवणे, प्रकाश आंधळे, गटविकास अधिकारी सुनील आहिरे, गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे, संजय कुसाळकर, मुक्त विद्यापीठाच्या माजी संचालक डॉ. संजीवनी महाले, डॉ. किरण खैरनार, भाऊसाहेब चासकर, राज्य अभ्या. समिती पुणेचे संदीप वाघचौरे, समितीचे राज्याध्यक्ष काळू बोरसे, संघाचे राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे,राकेश गिरासे, राजेश भांडगे, सुहास अलगट, किशोर पहिलवान,अर्जुन कोकाटे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थिती राहणार आहे. 

कुर्‍हाडे लिखित 'शिक्षणप्रवाह' पुस्तकात ग्रामीण-शहरी शिक्षण, बालपण, शाळाप्रवेश, शिक्षण, शिक्षणातील विविध स्थित्यंतरे, पालक शिक्षक समाज भूमिका यांना स्पर्श केला असून, ग्रामीण जीवन व शिक्षणाचे चित्रण मांडले आहे. मातृभाषा शिक्षणाचे महत्त्व विशद केले आहे. तर 'दृष्टीकोन' या पुस्तकात सकारात्मक विचार, अपंग समावेशित शिक्षण, जलसाक्षरता, पर्यावरण जागरूकता, मुलींचे महत्त्व, शिक्षणतज्ज्ञ, सहशालेय उपक्रम, खेड्यातील जीवन, वृक्षसंवर्धन, शिवरायांचा रयतेप्रती असणारा उदात्त दृष्टीकोन, भारतीय परंपरा आदीबाबतचा दृष्टीकोन मांडलेला आहे.

तालुक्यातील प्राथमिक शिक्षकाचा हा पहिलाच प्रयत्न असल्याने तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनाच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व शिक्षकांची समन्वय समितीने जोरदार तयारी केली असून, हा सोहळा यशस्वी करण्याकरिता सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समिती एकवटली आहे. शिक्षण व शिक्षकप्रेमी नागरिक या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका शिक्षक संघटना समन्वय समिती, अक्षरबंध प्रकाशन नाशिक व नानासाहेब कुर्‍हाडे यांनी केले आहे.

loading image
go to top