अखेर विखरणीच्या अक्षय प्रकाश योजनेला मिळाला मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

येवला - आंदोलने, निवेदने, ऊर्जा मंत्र्यांकडे बैठका असा मोठा पाठवूरावा केल्यानंतर तीन वर्षभरापेक्षा अधिक कालावधी उलटल्यानंतर विखरणी येथील अक्षय प्रकाशच्या कामाला मुहूर्त मिळाला. शुक्रवारी (ता.६) या कामाला सुरुवात झाली असून, मे पर्यत हे काम मार्गी लागणार आहे. यामुळे या विद्युत उपकेंद्रातून परिसरातील गावांना सिंगल फेज वीजपुरवठा सुरु होणार आहे. या कामासाठी पंचायत समिती सदस्य मोहन शेलार यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले. २०१४ मध्ये छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून विखरणी येथे विद्युत उपकेंद्र सुरु करण्यात आले.

येवला - आंदोलने, निवेदने, ऊर्जा मंत्र्यांकडे बैठका असा मोठा पाठवूरावा केल्यानंतर तीन वर्षभरापेक्षा अधिक कालावधी उलटल्यानंतर विखरणी येथील अक्षय प्रकाशच्या कामाला मुहूर्त मिळाला. शुक्रवारी (ता.६) या कामाला सुरुवात झाली असून, मे पर्यत हे काम मार्गी लागणार आहे. यामुळे या विद्युत उपकेंद्रातून परिसरातील गावांना सिंगल फेज वीजपुरवठा सुरु होणार आहे. या कामासाठी पंचायत समिती सदस्य मोहन शेलार यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले. २०१४ मध्ये छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून विखरणी येथे विद्युत उपकेंद्र सुरु करण्यात आले. मात्र या उपकेंद्रातून परिसरातील सहा गावे कायमस्वरूपी अंधारात असल्यामुळे हे उपकेंद्र सुरवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. विखरणी उपकेंद्रा अंतर्गत विखरणी, विसापूर, कातरणी, आडगाव रेपाळ, मुरमी, कानडी ही गावे असून, रात्रीचा वीजपुरवठा होत नसल्याने सर्व गावे गेल्या तीन वर्षापासून अंधारात होती. 

अक्षय प्रकाश योजनेंतर्गत या सहाही गावांना वीजपुरवठा करण्यात यावा यासाठी अनेकदा आंदोलनासह उपोषणाही करावे लागले होते. तसेच सब स्टेशन सुरु होण्याच्या वेळेस अक्षय प्रकाश योजनेसह सब स्टेशन कार्यान्वित करण्यात यावे म्हणून ग्रामस्थांनी मोहन शेलार यांच्या नेतृत्वाखाली या उपकेंद्राला टाळेही ठोकले होते. आमदार जयंत जाधव यांनी हा प्रश्न कायमचा निकाली निघावा म्हणून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोर हा प्रश्न मांडून यासाठी मंत्रालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक केली. अखेर या सर्वांच्या प्रयत्नांना यश येऊन दीनदयाळ उपाध्याय योजनेंतर्गत एसडीटी रोहीत्र या कामासाठी मंजूर करण्यात येऊन या कामाचा शुभारंभ करण्यात आला. 

येत्या एक महिन्यात हे काम पूर्ण करून लाभधारक सहा गावे उजेडात येतील अन याचा आनंद सगळ्यात जास्त मला होईल अशी प्रतिक्रिया मालेगाव विभागाचे अतिरीक्त कार्यकारी अभियंता सुरेश जाधव यांनी दिली. या कार्यक्रम प्रसंगी उपकार्यकारी अभियंता निलेश कोळी, सहाय्यक अभियंता गणेश चौधरी, मच्छिंद्र दराडे, राजवाडे, शिवाजी उशीर, नामदेव पगार, श्रावण वाघमोडे, बाबासाहेब ठोंबरे, जालिंदर शेलार, राजेंद्र शेलार, अरुण खरे, दयानंद खरे, मोतीराम आहीरे, अशोक बंदरे आदीसह सहाही गावातील नागरिक उपस्थित होते 

"मागील तीन वर्षापासून सतत पाठपुरावा, उपोषणासह आंदोलनही करावे लागले. काम सुरु झाल्याने सहा गावाचा प्रश्न मार्गी लागत असल्याने समाधान आहे. लोकप्रतिनिधी म्हणून भुजबळ साहेबांची उणीव वेळोवेळी जाणवली."
- मोहन शेलार,सदस्य पंचायत समिती येवला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yeola vikharni akshay prakash yojana