जळगाव- येथील रेल्वेस्थानकावरून दुचाकीने घराकडे जाणाऱ्या राहुल अशोक शिंदे (रा. चौघुले प्लॉट) या तरुणाची टोळक्याने दुचाकी अडवत त्याला शिवीगाळ करीत डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी (ता.७) रात्रीच्या सुमारास घडली. रक्तबंबाळ अवस्थेत जखमीला जिल्हा रुग्णालयात उपचार दाखल केले.