हौस, नशा आणि तरुणाई! वाचा..

young.jpg
young.jpg

नाशिक : सुरूवातीला मित्रमंडळीसोबत केवळ हौस म्हणून एखाद्या अमली पदार्थाचे सेवन कालांतराने व्यसनात रूपांतरीत होण्याचे प्रमाण वाढत आहे. शहरातील तरूणाई व्यसनांच्या विळख्यात अडकत आहे. त्यातही गांजा, भांग अशी दोन अमलीपदार्थांमुळे अनेक युवकांचे भवितव्य धोक्‍यात आलेले आहे. गंभीर बाब म्हणजे शालेय वयापासून मुले व्यसनाधीनतेकडे वळता आहेत. 

तरूणाईच्या हौशीचे रूपांतर होतेय व्यसनात

शहरात धुम्रपान आणि तंबाखू खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. आजच्या तरूण पिढीला व्यसन करणे ही खूप साधी सहज गोष्ट वाटत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. आपल्या आजूबाजूच्या उच्चभ्रू लोंकामध्ये रहावयाचे असेल तर त्यांच्या स्टेट्‌सप्रमाणे वागायला पाहिजे, असे त्यांना वाटते. ताण पडला की सिगारेट आणि जास्त दुःख झाले की मद्य अशी स्टाईल झाली आहे. व्यसन करणाऱ्या तरूणांची संख्या गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. त्यात शहरातील मुलींची संख्यादेखील कमी नाही. मुलीदेखील व्यसनांच्या आहारी मोठ्या प्रमाणात गेलेल्या आहेत. त्यात सिगारेट, मद्य, हुक्का, भांग, तंबाखू, गुटखा, पान, व्हाईटनर, पेट्रोल, गांजा, मिश्री, तपकिर, चरस, सोल्युशन, ड्रग्ज, निकोटिन, इ-सिगरेट यांसारखे शरीरास हानीकारक असलेले व्यसने महाविद्यालयीन तरूणांईकडून सर्रास केले जात आहेत. बांधकाम करणाऱ्या महिला व महाविद्यालयीन विद्यार्थिनीदेखील वेगवेगळे व्यसनांच्या आहारी गेलेल्या आहेत. कधी कधी नशा करण्यासाठी पैसे नसल्यास प्रसंगी चुकीचे पाऊल उचलण्यातही धजावत नसल्याने अप्रत्यक्षपणे गुन्हेगारीच्या सापळ्यातही युवक-युवती अडकता आहेत. शाळांमधील विद्यार्थ्यांचे सिगरेट, गुटखा यांचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. 

आरोग्यावर होतोय गंभीर परिणाम 
तरूणांचे प्रमाण गांजा, निकोटिन, व मद्य सेवनाचे प्रमाण जास्त वाढले आहे. तसेच शाळेतील विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे नशा करतांना निदर्शनात आले आहेत. त्यात मुख्यतः व्हाईटनर, पेट्रोल, सोल्युशन यांसारख्या हानिकारक द्रव्याचा वास ओढून नशा केली जात आहे. कॉलेज रोडवरील काही कॅफेमध्ये युवती सर्रास सिगरेट, हुक्का ओढतांना दिसतात. कुणी तणावामुळे तर कुणी मौजमजेच्या नावाखाली व्यसनांच्या विळख्यात अडकत आहे. 

कुटुंबियांनीही घरातील युवकांकडे लक्ष देण्याची गरज

मला समाज कार्य करण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेञात कार्य करत आहे. आत्तापर्यंत शंभरहून अधिक कुटुंब व्यसनाच्या वाईट सवयीपासून यशस्वीरित्या बाहेर काढले आहेत. सध्याची तरूणाई व्यसनाधीनतेकडे वळत असून, ही गंभीर बाब आहे. कुटुंबियांनीही घरातील या युवकांकडे लक्ष देण्याची गरज आहे. -मकरंद पवार, आधार व्यसनमुक्ती केंद्र.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com