सेल्फीचा मोह तरुणाईला काही आवरेना 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

नाशिक : पावसाळा आला की निसर्गरम्य ठिकाणांवर तरुणाईची गर्दी होते. निसर्गाचा आनंद घेताना, मोबाईलवर सेल्फी काढण्याचा मोह तरुणाईला आवरता आवरत नाही आणि नको ती दूर्घटना होण्याची शक्‍यता असते. अशा धोकादायक ठिकाणांवर नो-सेल्फीचे फलक प्रशासनाने लावले असले तरी त्याकडे दूर्लक्ष करीत, तर कधी स्वत:चा जीव धोक्‍यात घालून सेल्फी काढणाऱ्या तरुणाईला रोखायचे कसे, असा प्रश्‍न उभा राहतो आहे. 

नाशिक : पावसाळा आला की निसर्गरम्य ठिकाणांवर तरुणाईची गर्दी होते. निसर्गाचा आनंद घेताना, मोबाईलवर सेल्फी काढण्याचा मोह तरुणाईला आवरता आवरत नाही आणि नको ती दूर्घटना होण्याची शक्‍यता असते. अशा धोकादायक ठिकाणांवर नो-सेल्फीचे फलक प्रशासनाने लावले असले तरी त्याकडे दूर्लक्ष करीत, तर कधी स्वत:चा जीव धोक्‍यात घालून सेल्फी काढणाऱ्या तरुणाईला रोखायचे कसे, असा प्रश्‍न उभा राहतो आहे. 

पावसाळ्यात डोंगरदऱ्यांचा परिसर हिरवाईने नटतो. त्यामुळे डोंगराच्या माथ्यावरून कोसळणारे धबधबे अन्‌ त्यामुळे नद्या-नाल्यांना आलेल्या पाण्यात डुबण्याचा आनंद घेण्यासाठी शहरातील तरुणाई गर्दी करते. विशेषत: विकेएण्ड हा अलिकडे लोकप्रिय झालेल्या शनिवार-रविवारी तरुणाई अशा ठिकाणी जाते. सध्या, नाशिक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे अजूनही नद्या-नाल्यांना फारसे पाणी नसले तरी पर्यटक तरुणाई मात्र धबधब्यांच्या ठिकाणी मौजमजा करण्यासाठी येते आहे. गंगापूर गावानजिकच्या सोमेश्‍वर धबधबा गेल्या काही दिवसांपासून गजबजला आहे. गोदावरी नदीला पाणी नसले तरी तरुण मुले-मुली धोकादायक असलेल्या ठिकाणांवर बसून सेल्फी काढताहेत. एवढेच नव्हे तर काहींनी थेट धबधब्याच्या दरीमध्ये उतरून अत्यंत जीवघेण्या ठिकाणी बसून वा उभे राहून सेल्फी काढत आहेत. त्यातून दूर्घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

त्याचप्रमाणे गोदाघाटावरही अनेक ठिकाणी प्रशासनाने नो-सेल्फीचे फलक लावले आहेत. मात्र तरीही गोदाघाटावर फेरफटका मारण्यासाठी आलेले तरुण व कुटुंबीय हे सेल्फी काढताना दिसतात. तसेच, गांधी तलावात फेरफटका मारण्यासाठी बोटींग आहे. बोटींग करीत असताना काही तरुण हे धोकादायक रित्या बोटीत उभे राहतात आणि स्वत: सेल्फी धोकादायकरित्या काढताहेत. अशावेळी बोटींग संचालकाने अशा पर्यटकांना वा तरुणांना समज देणे वा बोटींग करताना त्यांच्याकडील मोबाईल काढून घेणे गरजेचे आहे. 

धोकादायक सेल्फीची ठिकाणे 
शहरात : गोदाघाटावरील पुल (दुथडी गोदावरी वाहत असेल तर), सोमेश्‍वर धबधबा, गंगापूर धरण, तपोवन. जिल्ह्यात : नांदूरमध्यमेश्‍वर, अशोकाफॉल, दुगारवाडी, पहिने, कसारा घाट, ब्रह्मगिरी पर्वत (त्र्यंबकेश्‍वर). 

सेल्फी काढताना जीवाला धोका पोहोचणार याची काळजी घेण्याची गरज आहे. परंतु तरुणाईला अटकाव करणेही कठीण असते. तरीही शहरातील जी ठिकाणी धोकादायक आहेत, अशा ठिकाणी नो-सेल्फीचे फलक लावण्यात आले आहेत. तरुणाईने अशा ठिकाणी सेल्फीचा मोह आवरून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

- विजयकुमार मगर, उपायुक्त, गुन्हे शाखा, नाशिक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth not aware for selfie