esakal | जुगाऱ्यांना कोरोना पेक्षा कॅमेराची भिती जास्त ; जळगावात जुगार अड्ड्यावर राजकिय पुढारी अटकेत 
sakal

बोलून बातमी शोधा

zp member arrested in shirsoli

"कोरोना'मुळे प्रत्येकाच्या तोंडावर मास्क बांधलेले दिसून येत असताना शिरसोलीच्या जुगारअड्ड्यावर मात्र, "खुल्लम खुल्ला' जुगारचा खेळ सुरू होता. मोकाटपणे जुगार खेळणाऱ्यांना कोरोनाची कसलीच भीती नसल्याने त्यांची तोंड उघडीच होती. पोलिस अटक करत छायाचित्रण होत असल्याचे दिसताच त्यांनी तोंडाला रुमाल बांधून तोंड लपवले

जुगाऱ्यांना कोरोना पेक्षा कॅमेराची भिती जास्त ; जळगावात जुगार अड्ड्यावर राजकिय पुढारी अटकेत 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शिरसोली - कुऱ्हाडदे रस्त्यावर शेताच्या बांधावर जुगारअड्डा चालवला जात असल्याच्या माहितीवरून एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. छाप्यात पंधरा जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून 31 हजार 400 रुपयांच्या रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांच्या छाप्यात विद्यमान पंचायत समिती सभापती नंदलाल पाटील व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धोंडू जगताप यांचा समावेश असल्याने एकच चर्चेला उधाण आले आहे. 

शिरसोलीत जुगारअड्डा चालवला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून निरीक्षक विनायक लोकरे यांच्यासह उपनिरीक्षक विशाल सोनवणे, अतुल वंजारी, हेमंत पाटील, जितेंद्र राठोड, प्रकाश पवार यांच्या पथकाने शिरसोली - कुऱ्हाडदा रस्त्यावर एस. पी. पाटील यांच्या शेतात छापा टाकला. त्यात मनोज रामकृष्ण बारी (39), कृष्णा राजू सोनवणे (वय 22), राहुल राजेंद्र ताडे (वय 22), भूषण लाटू खलसे (वय 24), सचिन बाळू बारी (वय 21), विनोद लक्ष्मण मोरे (वय 22), सुनील शंकर काटोले (वय 46), बापू सीताराम महाजन (वय 42), शिवाजी हरी बारी (वय 33), शिवदास उत्तम बारी (वय 38), नंदलाल शांताराम पाटील (वय 45), राहुल कृष्णा बारी (वय 33), महेश विक्रम महाजन (वय 24), धोंडू श्‍यामराव जगताप (वय 48), गोरक रामसिंग केदारे (वय 51) अशा पंधरा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भीती "कोरोना'ची की कॅमेऱ्याची 
"कोरोना'मुळे प्रत्येकाच्या तोंडावर मास्क बांधलेले दिसून येत असताना शिरसोलीच्या जुगारअड्ड्यावर मात्र, "खुल्लम खुल्ला' जुगारचा खेळ सुरू होता. मोकाटपणे जुगार खेळणाऱ्यांना कोरोनाची कसलीच भीती नसल्याने त्यांची तोंड उघडीच होती. पोलिस अटक करत छायाचित्रण होत असल्याचे दिसताच त्यांनी तोंडाला रुमाल बांधून तोंड लपवले. 


राजकीय दबावाचा प्रयत्न 
विद्यमान पंचायत समिती सभापती नंदलाल पाटील व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धोंडू जगताप या दोघांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी सुरवातीला जागेवरच प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस पथकाने अटकेची तयारी करूनच सर्वांना ताब्यात घेतल्यावर नंतर कारवाई होऊ नये, यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तो र्यंत घटना पंचक्रोशीत पोचून गेली होती. पोलिसांनी सर्व जुगाऱ्यांना अटक करून रीतसर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या ताब्यातून 31 हजार 400 रुपये रोख मिळून आले आहेत. 


 

loading image