‘भाजपमध्ये जाण्यापूर्वी मुलायम यांनी दिला होता हा सल्ला’

भारतीय कुटुंब व्यवस्थेत जेव्हा मुलीचे लग्न होते तेव्हा सासरे वडिल होतात
Aparna Yadav
Aparna Yadavअपर्णा यादव
Updated on

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुलायम सिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा यादव (Aparna Yadav) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अपर्णा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरपा समाजवादी पक्षाचे (samajwadi party) संस्थापक मुलायम सिंह यादव (Mulayam singh Yadav) हे सूनेच्या या निर्णयाशी सहमत आहेत की नाही याचा खुलासा स्वतः केला. मुलायम सिंह यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयावर काय सल्ला दिला होता, हेही सांगितले.

भारतीय कुटुंब व्यवस्थेत जेव्हा मुलीचे लग्न होते तेव्हा सासरे वडिल होतात. मला माझ्या वडिलांनी (मुलायम) खूश राहण्याचा आशीर्वाद दिला. मी वेळोवेळी वडिलांसमोर माझे मुद्दे मांडते आणि त्यांचे ऐकते. मुलायम सिंह यादव (Mulayam singh Yadav) सूनांना कधीही कोणत्याही गोष्टीसाठी थांबवत नाही. असे करा, असे करू नका, हे करू नका, हे करू नका असे म्हणत नाही, असेही अपर्ण (Aparna Yadav) यांनी एका टीव्ही मुलाखतीत सांगितले.

Aparna Yadav
पाया सूप आहे लाभदायी; जाणून घ्या आरोग्यविषयक फायदे

त्यांनी मोठी राजकीय समज दिली. कुटुंब आपल्या जागी आहे आणि राष्ट्रवाद एका बाजूला आहे, असे मुलायम सिंह यादव (Mulayam singh Yadav) यांनी सांगितल्याचे अपर्णा यांनी सांगितले. कुटुंबापेक्षा राष्ट्रवाद महत्त्वाचा आहे. त्यामुळेच भाजपमध्ये (BJP) जाण्याचा निर्णय घेतला. मला मुलायम सिंह यादव यांचा आशीर्वाद आहे, असेही अपर्णा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com