निकालापूर्वी अखिलेश यादव यांचे EVM सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; केले गंभीर आरोप

अखिलेश यादव
अखिलेश यादव sakal media

उद्या म्हणजेच 10 मार्च रोजी जाहीर होणार्‍या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी (UP Assembly Election Results 2022) समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सच्या (EVM) सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला तसेच त्यांचा आता निवडणूक आयोगावर विश्वास नाही असे देखील ते म्हणाले.

मंगळवारी ईव्हीएमवरून सपा आणि भाजपमध्ये बाचाबाची झाली. सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आरोप केला की, भाजपच्या इशाऱ्यावर अधिकारी मतमोजणीत हेराफेरी करण्याचा कट रचत आहेत. सुरक्षेशिवाय इव्हीएम इकडून तिकडे नेले जात आहेत. दुसरीकडे, सपा कार्यकर्त्यांनी वाराणसीमध्ये ईव्हीएम फेरफार आणि बरेलीमध्ये कचऱ्याच्या ट्रकमध्ये कोऱ्या मतपत्रिका टाकल्याचा आरोप करत गोंधळ घातला. त्याला प्रत्युत्तर देत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, निकालाच्या दिवशी अखिलेश म्हणतील, ईव्हीएम खूप अविश्वासू आहे.

या दरम्यान, यूपीच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी सर्व शंका फेटाळून लावत सर्व ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला. उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी अजय कुमार शुक्ला यांनी वाराणसीमध्ये ट्रकमधून ईव्हीएम वाहतूक केल्याप्रकरणी स्पष्टिकरण देले आहे ते म्हणाले की, ते इव्हीएम मशीन त्यांना प्रशिक्षणासाठी नेण्यात आले होते. उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी अजय कुमार शुक्ला यांनी म्हटले आहे की, वाराणसी जिल्ह्यातील सर्व विधानसभा जागांवर मतदानात वापरलेले ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये बंद आहेत आणि ते केंद्रीय निमलष्करी दलाच्या त्रिस्तरीय सुरक्षेखाली सुरक्षित आहेत.

अखिलेश यादव
युक्रेन यापुढे NATO सदस्यत्वासाठी आग्रह धरणार नाही; रशियासमोर झेलेन्स्की नरमले

अहवाल मागवला

ट्रकमध्ये ईव्हीएम वाहून नेल्याप्रकरणी त्यांनी सांगितले की, या संदर्भात वाराणसीच्या जिल्हा अधिकाऱ्याकडून तातडीने अहवाल मागवण्यात आला होता. त्यांनी पाठवलेल्या अहवालानुसार वरील वाहनात वाहून नेलेल्या ईव्हीएमवर प्रशिक्षणासाठी खुणा करण्यात आल्याचे तपासादरम्यान आढळून आले. प्रशिक्षणासाठे नेल्या जात असलेल्या मशीनच्या गाड्यांना अडवून काही राजकीय लोकांकडून आफवा पसरवली जात आहे असे सांगण्यात येत आहे.

रिपोर्ट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला जाणार

बरेलीमध्ये नगरपालिकेच्या कचरावाहू वाहनात निवडणूक साहित्य मिळाल्याचा रिपोर्ट जिल्हा दंडाधिकार्‍यांकडून मागवण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल येताच संपूर्ण प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येईल, असे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.ब्रम्हदेव राम तिवारी यांनी सांगितले. तत्पूर्वी, समाजवादी पक्षाने बरेलीतील स्ट्रॉंगरूमच्या बाहेर साध्या बॅलेट पेपरच्या व्हिडिओची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती.

अखिलेश यादव
Maruti ची आणखी एक CNG कार लॉंच, देते जबरदस्त मायलेज; पाहा किंमत

ट्विटरवर अखिलेश यादव म्हणाले की, वाराणसीमध्ये ईव्हीएम अडकल्याची बातमी यूपीच्या प्रत्येक विधानसभेला सतर्क राहण्याचा संदेश देत आहे. "मतमोजणीत हेराफेरीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सपा-आघाडीचे सर्व उमेदवार आणि समर्थक त्यांच्या कॅमेऱ्यांसह सज्ज असले पाहिजेत. युवा लोकशाही आणि भविष्याचे रक्षण करण्यासाठी, मतमोजणीत सैनिक व्हा," असे अखिलेश यादव यांनी हिंदीत लिहिले. दरम्यान, अनेक एक्झिट पोलमध्ये यूपी निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या विजयाचा अंदाज वर्तवल्यानंतर , सपा प्रमुख म्हणाले की एक्झिट पोल केवळ भाजप जिंकत असल्याची धारणा निर्माण करू इच्छित आहेत.

"समाजवादी पक्ष अयोध्या जिंकत आहे, त्यामुळे भाजप घाबरला आहे. एक्झिट पोल भाजप जिंकत असल्याचा समज निर्माण करू इच्छित आहे. लोकशाहीसाठी हा शेवटचा लढा आहे," अखिलेश यादव पुढे म्हणाले.

अखिलेश यादव
सॅमसंगचा नवीन 5G स्मार्टफोन भारतात लॉंच, किंमत 17,499 पासून सुरु

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com