
जया बच्चन यांचा भाजपवर हल्ला; योगी-मोदी यांनी राजकारण सोडून...
१५ वर्षांपासून महिलांच्या सुरक्षेसाठी काम करीत आहे. महिला सुरक्षेबाबत योगी सरकारने केलेले दावे पोकळ आहेत. भाजपचे सरकार आल्यापासून महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. भाजप फक्त शहरे आणि रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचे काम करीत आहे. मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजकारणाशी संबंध नाही. त्यांनी झोपडीत जावे, असा हल्ला सपा नेत्या व राज्यसभा खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी केला. (Jaya Bachchan attack on BJP)
शनिवारी (ता. २६) मडियाहून आणि मच्छलीशहर येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशला एक्स्प्रेस वेचा रस्ता दाखवला. ते लोकांच्या हृदयावर राज्य करीत आहे. जया यांनी मच्छलीशहरमध्ये त्यांच्या निधीतून महिलांच्या सुरक्षेसाठी सल्लागार कक्ष सुरू करण्याचे आश्वासन दिले. मंचावरूनच त्यांनी अखिलेश यादव यांच्या सरकारमध्ये झालेल्या विकासकामांवर कविता ऐकवली.
भाजपला (BJP) कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवावे लागेल असे दिसते. सपाचे सरकार आल्यास पाच वर्षे मोफत रेशनसोबत तेल-तूप देऊ. सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण आणि २२ लाख नोकऱ्याही देण्यात येणार आहेत. महिलांचे पेन्शन १,८०० रुपये प्रति महिना केले जाईल. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस दलात महिलांची भरती केली जाईल, असे माजी खासदार डिंपल यादव (Dimple Yadav) म्हणाल्या.
Web Title: Jaya Bachchan Yogi Adityanath Narendra Modi Uttar Pradesh Assembly Election
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..