
निवडणुकीत भाजपला मतदान करणं एका मुस्लिम महिलेला चांगलंच महागात पडलंय.
भाजपला मतदान करणं पडलं महागात; मुस्लिम महिलेला घराबाहेर हाकललं
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly Election) भाजपला (BJP) मतदान करणं एका मुस्लिम महिलेला (Muslim Women) चांगलंच महागात पडलंय. संतापलेल्या सासरच्या लोकांनी तिला मारहाण करून घराबाहेर काढलंय. यासोबतच पोलिसांत (Police) तक्रार केल्यास घटस्फोट घेऊन भावाला ठार मारण्याची धमकीही दिलीय.
एजाज नगर गौटिया येथील रहिवासी ताहिर अन्सारी यांची मुलगी उजमा हिचा विवाह त्याच परिसरातील तस्लीम अन्सारीसोबत जानेवारी 2021 मध्ये झाला होता. या दोघांनी प्रेमविवाह केला होता. पीडितेनं विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान केल्याचं घरी सांगितलं. यानंतर मौलाना तय्यब आणि मेहुणा आरिफ यांना ही बाब समजल्यावर त्यांनी उजमाला मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलेनं भाजपला मतदान केल्याचं सांगताच ते चांगलेच संतापले. मामा आणि मेहुणा म्हणाला, तिनं भाजपला मतदान केल्यामुळं तिचा पती तिला घटस्फोट देणार आहे. भाजप सरकारनं (BJP Government) हे रोखून दाखवावं, असा खुलं आव्हान त्यांनी केलंय. उजमाचे वडील ताहिर अन्सारी सांगतात, उजमा खूप मेहनती आहे. भाजपला मतदान केल्यामुळं मुलीला सासरच्यांनी घरातून हाकलून दिलंय. सध्या ती आता माझ्यासोबतच राहत आहे. दरम्यान, पीडित तरुणी आणि कुटुंबीयांनी पोलिसांकडं मदतही मागितलीय.
हेही वाचा: ठरलं! एन. बीरेन सिंह आज पुन्हा घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
तंजीम उलमा-ए-इस्लामचे राष्ट्रीय सरचिटणीस मौलाना शहाबुद्दीन रझवी म्हणाले, राजकीय पक्षांना मतदान करणं हा घटनात्मक अधिकार आहे. कोणताही पुरुष किंवा स्त्री कोणत्याही उमेदवाराला अथवा पक्षाला मतदान करू शकतात. याकडं राजकीय दृष्टिकोनातून पाहणं योग्य नाहीय. पीडितेनं भाजपला मतदान केल्यामुळं सासर किंवा पती घटस्फोटाची धमकी देत असेल, तर ते चुकीचं आहे. सासरच्यांनी पीडितेची माफी मागितली पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं.
Web Title: Muslim Woman Assaulted Evicted From Home In Bareilly Due To Voting For Bjp Uttar Pradesh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..