
बैठकीत विरोधी पक्षनेतेपदाचा प्रस्ताव ज्येष्ठ आमदार अवधेश प्रसाद यांनी मांडला.
उत्तर प्रदेश विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी अखिलेश यादव यांची निवड
लखनऊमधील (Lucknow) समाजवादी पक्षाच्या (Samajwadi Party) कार्यालयात आज विधिमंडळ पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अखिलेश यादव यांची विधीमंडळ पक्ष आणि विधिमंडळाच्या नेतेपदी एकमतानं निवड करण्यात आलीय. आता सभागृहात शपथ घेतली जाईल. अखिलेश यादव (Akhilesh Yadav) हे विरोधी पक्षनेते असतील, असा निर्णय बैठकीत एकमतानं घेण्यात आला. अखिलेश यादव यांनी 28 एप्रिल रोजी इतर पक्षांच्या नेत्यांना बोलावलंय. या बैठकीला शिवपाल सिंह यादव (Shivpal Singh Yadav) हेही उपस्थित असतील.
आज लखनऊमध्ये सकाळी 11 वाजल्यापासून समाजवादी पक्षाच्या निवडून आलेल्या आमदारांची बैठक सुरू होती. या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदाचा प्रस्ताव ज्येष्ठ आमदार अवधेश प्रसाद यांनी मांडला. आलम बदी यांनी अनुमोदन दिलं, तर विधिमंडळ पक्षाचे नेते लालजी वर्मा यांनी प्रस्तावित केलं. यासोबतच विधान परिषदेचा प्रस्ताव राजेंद्र चौधरी यांनी मांडला. आता अखिलेश यादव विरोधी पक्षनेते म्हणून जनतेची बाजू मांडणार, हे स्पष्ट झालंय.
हेही वाचा: Delhi Budget : 'केजरीवाल सरकार 20 लाख नोकऱ्या देणार'
गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षनेतेपदाची धुरा कोणाकडं जाणार, अशी चर्चा सुरू होती. कारण, शिवपाल यादव यांचं नाव आघाडीवर होतं. मात्र, त्यांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी करहल विधानसभेतून (Karhal Assembly Constituency) निवडणूक जिंकलीय. आझमगडमधून खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी आमदार राहण्याचा निर्णय घेतलाय. राज्यात समाजवादी पक्षाला (सपा) सत्तेत परतता आलं नसलं, तरी आमदारांची संख्या शंभरहून अधिक झाल्याचं स्पष्ट झालंय. अशा स्थितीत प्रमुख विरोधी पक्ष सपा आहे.
Web Title: Samajwadi Party Akhilesh Yadav To Be Leader Of Opposition In Up Assembly
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..