'Akhilesh Yadav औरंगजेब आहे; जो आपल्या बापाचा कधी होऊ शकला नाही, तर तो..'

Shivraj Singh Chouhan vs Akhilesh Yadav
Shivraj Singh Chouhan vs Akhilesh Yadavesakal
Summary

'औरंगजेबनं आपल्या बापाला तुरुंगात टाकलं, भावांना ठार मारलं.'

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (CM Shivraj Singh Chouhan) हे यूपी विधानसभा निवडणुकीत (UP Assembly Election) स्टार प्रचारक आहेत. उत्तर प्रदेशातील देवरिया येथे निवडणूक सभेला संबोधित करताना सीएम शिवराज सिंह चौहान यांनी अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. सीएम शिवराज यांनी अखिलेश यांची तुलना औरंगजेबशी (Aurangzeb) केलीय. जसजसे निवडणुकीचे टप्पे पुढे सरकत असताना भाजप (BJP) आणि सपाच्या (SP) नेत्यांमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू झालंय. राज्यात आतापर्यंत 3 टप्प्यात मतदान झालं असून पुढील टप्प्यासाठी निवडणूक प्रचार (Uttar Pradesh Assembly Election) जोरात सुरूय.

शिवराज सिंह चौहान पुढे म्हणाले, अखिलेश यादव आजचा औरंगजेब आहे. 'जो आपल्या बापाचा कधी होऊ शकला नाही, तर तो तुमचा काय होणार? असं मी म्हणत नाही', तर असं मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांनी अखिलेशना म्हंटलं होतं. औरंगजेबानंही तेच केलंय. वडिलांना तुरुंगात टाकलं, भावांना ठार मारलं. अखिलेश यांनी जेवढा अपमान केला, तेवढा जगात कोणीही केला नसेल, असंही मुलायमसिंह म्हणाले होते. याची शिवराज सिंह यांनी अखिलेशना आठवण करुन दिली.

Shivraj Singh Chouhan vs Akhilesh Yadav
भाजपच्या फायर ब्रँड नेत्या पुन्हा निवडणूक लढवणार

उत्तर प्रदेशात आता चौथ्या टप्प्यासाठी प्रचार सुरु झालाय. सपा आणि भाजपमधील वाकयुद्धही चांगलंच रंगलंय. एकीकडं सत्ताधारी पक्ष सपाचे मागील अपयश दाखवत आहे, तर दुसरीकडं अखिलेश योगी सरकारच्या धोरणांवर कडाडून प्रश्न उपस्थित करत आहेत. रविवारी उत्तर प्रदेशमधील 16 जिल्ह्यांतील विधानसभेच्या 59 जागांसाठी मतदान झालं. 2017 मध्ये भाजपनं या जागांवरून 49 जागा जिंकल्या होत्या. तर सपाला केवळ 9 जागांवर यश मिळालं. या टप्प्यात काँग्रेसला 1 जागा आणि बसपाला एकही जागा मिळाली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com