UP Results 2022 Live: जनतेचा कौल नम्रतेने स्विकारतो - राहुल गांधी

UP Results 2022 Live: जनतेचा कौल नम्रतेने स्विकारतो - राहुल गांधी

लखनऊ: उत्तर प्रदेशसहित पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागणार आहे. लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या यूपीच्या या निवडणुकीमध्ये 403 जागांसाठी मतदान झालं असून एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं आहे. पहिला टप्पा 10 फेब्रुवारी, दुसरा टप्पा 14 फेब्रुवारी, तिसरा टप्पा 20 फेब्रुवारी, चौथा टप्पा 23 फेब्रुवारी, पाचवा टप्पा 27 फेब्रुवारी, सहावा टप्पा 3 मार्च आणि सातवा टप्पा 7 मार्च रोजी पार पडला आहे. आज 10 मार्च रोजी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीचे इत्यंभूत लाईव्ह अपडेट्स फक्त 'सकाळ'वर. ..

  • निवडणुकांमध्ये जनतेने दिलेला कौल आम्ही नम्रतेने स्वीकारला असून, या निवणुकांमध्ये जनादेश जिंकणाऱ्यांचे अभिनंदन त्यांनी केले आहे. या निवडणुकांमध्ये मी सर्व काँग्रेस कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांचे त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल आभार मानतो. या निवडणुकांमधून आम्ही शिकू आणि भारतातील लोकांच्या हितासाठी काम करत राहू असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

  • समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची चूक नाही, त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवली. त्यांनी मतदानाच्या निकालाचा विचार करू नये कारण त्यांची कामगिरी पूर्वीपेक्षा चांगली आहे. ते पूर्वीपेक्षा चांगले लढले: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

  • लखनऊमध्ये भाजपच्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर उत्साहाचं वातावरण

  • उत्तर प्रदेशमधील मोठ्या विजयाच्या पार्श्वभूमीवर लाडू बनवून त्यांचं वाटप करण्यात येत आहेत.

  • आमचं सरकार स्थापन होणार हे आम्हाला आधीच माहीत होतं. आम्ही विकासाच्या प्रत्येक पैलूवर काम केलंय, म्हणूनच जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. बुलडोझरसमोर काहीही टिकू शकत नाही, कारण तो एका मिनिटात सर्वकाही संपवू शकतो. मग ते सायकल असो किंवा इतर काहीही: भाजप खासदार हेमा मालिनी

  • समाजवादी पक्षाचे आझम खान हे रामपूर मतदारसंघातून आघाडीवर आहेत तर स्वामी प्रसाद मौर्य हे फाझीलनगर मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.

  • यूपीमध्ये भाजपने आघाडी घेतल्यानंतर लखनऊ कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून होळी खेळली जात आहे.

  • दुपारी 12 वाजेपर्यंतचे कल

भाजप - 270

सपा - 120

बसपा - 07

काँग्रेस - 05

इतर -01

  • थोड्याच वेळात अखिलेश यादव यांची पत्रकार परिषद

  • काँग्रेसने दिल्लीमध्ये ईव्हीएमविरोधात निदर्शने सुरु केली आहेत.

सकाळी ११ वाजेपर्यंतचे कल -

  1. भाजप - २५७

  2. सपा - १२३

  3. काँग्रेस - ०३

  4. बसप - ०६

  5. इतर - ०३

गोरखपूरमधूल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आघाडीवर, तर सिराथूमधून उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य पिछाडीवर

मोदींच्या मतदारसंघातूनच भाजप उमेदवार पिछाडीवर -

पंतप्रधान मोदी यांचा मतदारसंघ वाराणसीमधून भाजपचे उमेदवार निलकंठ तिवारी पिछाडीवर असून समाजवादीचे कामेश्वर दीक्षित आघाडीवर आहेत.

स्वामी प्रसाद मौर्य पिछाडीवर -

निवडणुकीपूर्वी भाजपमधून समाजवादीमध्ये गेलेले स्वामी प्रसाद मौर्य फाजिलनगर मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.

भाजपच्या अदिती सिंह बरेली विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर

शिवपाल यादव पिछाडीवर -

समाजवादी पक्षाचे शिवपाल यादव हे उत्तर प्रदेशातील प्रमुख चेहरा असून ते जसवंतनगर मतदारसंघातून पिछडीवर आहेत.

सकाळी १० पर्यंतची आकडेवारी -

  1. भाजप - २३६

  2. सपा - ८७

  3. काँग्रेस - ६

  4. बसप - ०४

  5. इतर - ०४

  • करहल विधानसभेच्या जागेवर समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आघाडीवर आहेत, तर बसपा आणि भाजप अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

  • सकाळी 9:30 वाजेपर्यंतचे कल

भाजप : 204

सपा : 111

बसपा : 5

काँग्रेस : 3

इतर : 6

  • गोरखपूरमध्ये योगी आदित्यनाथ यांची 4 हजार 464 मतांनी आघाडी

  • यूपीत बसपानं खातं उघडलं

  • सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपच्या अल्का सिंग या सांदिला मतदारसंघातून आघाडीवर आहेत.

  • मतमोजणी केंद्रांवर रात्रंदिवस जागरुक आणि जाणीवपूर्वक कार्यरत राहिल्याबद्दल सपा-युतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे, समर्थकांचे, नेत्याचे, पदाधिकारी आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार! 'लोकशाहीचे सैनिक' विजयाचे प्रमाणपत्र घेऊनच परततील! - अखिलेश यादव, समाजवादी पक्ष प्रमुख

  • भाजपमधून ऐन निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी पक्षात गेलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांनी ट्विट करत म्हटलंय की, जनता जिंकत आहे तर गुंडगिरी हारत आहे.

  • पहिले कल हातात आले असून 403 जागांमध्ये 80 जागांमध्ये भाजप आघाडीवर असून 48 जागांवर सपा पुढे आहे. बसपा 3 तर काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहेत.

  • भाजप सोडून समाजवादी पक्षामध्ये सामील झालेले स्वामी प्रसाद मौर्य मतमोजणीत पुढे

  • समाजवादी पक्षाचे प्रमुक अखिलेश यादव मतमोजणीत पुढे

  • विधानसभा निवडणुकीसाठी ३१ हजार नवीन मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. आम्ही 1,900 मतदान केंद्रे तयार केली आहेत जी महिलांद्वारे चालवली गेली. आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये महिलांचा मोठा सहभाग दिसून आला. 5 पैकी 4 राज्यांमध्ये, महिला मतदारांची टक्केवारी पुरुष मतदारांपेक्षा जास्त होती: CEC सुशील चंद्र

  • वाराणसीत मतमोजणी सुरू होताच निदर्शनेही सुरू झाली आहेत. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्ट्राँग रूममध्ये जायचे होते, मात्र त्यांना थांबवण्यात आले. त्यानंतर निदर्शने आणि घोषणाबाजी सुरू झाली आहे.

  • ईव्हीएममध्ये छेडछाड करण्याचा प्रश्नच येत नाही. 2004 पासून EVM चा सतत वापर केला जातो, 2019 मध्ये आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर VVPAT वापरण्यास सुरुवात केली. राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएम सील केले जातात: सुशील चंद्र, मुख्य निवडणूक आयुक्त

  • पहिला कल

    भाजप - 25

    सपा - 18

  • उत्तर प्रदेशसहित पाच राज्यांतील मतमोजणीला सुरुवात...

  • वाराणसीमधील ईव्हीएम मशीन्सची जागा बदलण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन अखिलेश यादव यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. तसेच भाजप निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये गडबड करत असल्याचा आरोप केला होता. याच पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीने या मतमोजणीच्या लाईव्ह वेबकास्टींगची मागणी केली आहे. मात्र, निवडणूक आयोगाने सपाचे सर्व आरोप फेटाळून लावले. आहेत.

  • भाजपचेच सरकार येईल - राजेश्वर सिंग, भाजप उमेदवार

  • मतदान केंद्रे मतमोजणीसाठी सुसज्ज झाली आहेत.

मतअसा होता यूपी विधानसभा निवडणूक 2017 चा निकाल

एकूण जागा: ४०३

बहुमत: २०२

  • भाजप: ३१२

  • सपा: ४७

  • बसपा:१९

  • अपना दल: ९

  • काँग्रेस: ७

  • अपक्ष: ३

  • एसबीएसपी: ४

  • राष्ट्रीय लोक दल :१

  • निशाद:१

  • उत्तर प्रदेशमध्ये मतमोजणीसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. काही दृश्ये वाराणसीमधील...

उत्तर प्रदेशात सातव्या टप्प्यात मतदान पार पडले आहे. भाजपने यावेळीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून योगींना संधी दिली आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने ४०३ पैकी ३१२ जागा मिळवल्या होत्या. तर भाजपनंतर समाजवादी पक्षाने ४७ आणि बसपाने १९ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला फक्त ७ जागाच राखता आल्या होत्या. उत्तर प्रदेशात १९८५ नंतर एकाही मुख्यमंत्र्याला जनतेने सलग दुसऱ्यांदा संधी दिली नाहीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com