UP Election 2022 : वाराणसीकरांना द्यायचीये योगींनाच संधी!

युवक, व्यापारी, प्राध्यापकांना कमळ हवे; उत्तर प्रदेशाला विकासाची संधी
up election 2022
up election 2022esakal

वाराणसी: शहरातील व्यापारी, नागरिक, विद्यार्थी व प्राध्यापकांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या पाच वर्षांत खूप चांगली कामे सुरू केली असून, त्यांना दुसरी संधी मिळालीच पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. अर्धी कामे पूर्ण करण्याची संधी त्यांना द्यायला काहीच हरकत नाही व राज्याचा मूड पाहता हीच शक्यता अधिक दिसते, असे या सर्वांनीच स्पष्ट केले.

जुन्या वाराणसीतील गल्ली-बोळांतून फिरताना कोणाही व्याप्याऱ्याला, दुकानदाराला निकाल कोणाच्या बाजूने लागणार आहेत, असे विचारताच प्रत्येकाचे उत्तर `योगी` असेच होते. काही युवा कार्यकर्त्यांना योगींना लोकांना रोजगार देण्यात अपयश आल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर एकाने त्यासाठी कोरोनाला जबाबदार धरले, तर दुसऱ्याने आधीच्या सरकारच्या तुलनेत ५ वर्षांत ५० हजार अधिक नोकऱ्या दिल्याचे व साडेचार लाख लोकांना घरे दिली असून, या नागरिकांना आयुष्यातील सर्व कमाई उपयोग आणली तरी घर घेणे शक्य झाले नसते, असा दावा केला. मोदींना केलेल्या काशी विश्वेश्वर कॉरिडॉर पाहिल्यानंतर त्यांचे विरोधक भाजपला मते दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास अगरवाल या युवकाचा सूर होता. भारतातील सर्वांत जुन्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या बनारस हिंदू विद्यापीठातील युवकांनाही एकमुखाने आम्हाला योगीच मुख्यमंत्री हवेत, असे सांगितले. योगींनी शिक्षण, स्वास्थ्य व सुरक्षा या त्रिसूत्रीवर अत्यंत प्रभावी काम केले आहे. या कामांमुळे बनारससह संपूर्ण उत्तर प्रदेशात भाजला मोठे यश मिळेल असा दावा विपूल सिंग या विद्यार्थ्याने केला. सागर तिवारी या विद्यार्थ्यांना मात्र योगींच्या काळातही लोकांचे कामे झालेली नाहीत व प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार होत असल्याचा दावा केला. योगी सरकारने कोरोना मृत्युपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांपर्यंतच्या प्रत्येक समस्या झाकून ठेवल्या आहेत. युवकांना बेरोजगार ठेवले जात आहे. त्यामुळे लोकांना आता बदल हवा आहे, असेही त्याने सांगितले. युगलकिशोर सिंग व दयाशंकर त्रिपाठी या विद्यापीठातील प्राध्यापकांनीही योगी अत्यंत प्रामाणिक व्यक्ती आहेत, त्यांनी गुंड व बदमाशांना पळवून लावले, लॅण्ड माफियांना तुरुंगात टाकले व लोकांनी पोर्टलवर तक्रार केल्यावर लगेचच त्यांच्या समस्या सोडवल्या आहेत. त्यामुळे त्यांना दुसरी संधी दिलीच पाहिजे, असे सांगितले. दरम्यान, वाराणसी शहरात उद्या (शुक्रवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड-शो व सभा होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com