
आपल्या मुलाचं तिकीट कापल्यानं भाजप खासदार कोणता निर्णय घेणार हे लवकरच समजणार आहे.
UP Election : भाजपनं खासदाराच्या मुलाचं तिकीट कापलं
Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमधला 'राजकीय सस्पेंस' संपलाय. सपापाठोपाठ भाजपनंही आपले उमेदवार जाहीर केले आहेत. दोघांच्या यादीत धक्कादायक नावं समोर आली आहेत. राज्यमंत्री स्वाती सिंह (Swati Singh) यांचा पत्ता कट करण्यात आलाय. तर, रीटा बहुगुणा जोशी (Rita Bahuguna Joshi) यांचं भावनिक कार्डही चाललं नाही आणि अपर्णा यादव (Aparna Yadav) यांनाही तिकीट मिळालं नाही, त्यामुळं निवडणुकीत मोठी रंगत पहायला मिळणार आहे.
सपापाठोपाठ भाजपनंही लखनौच्या उमेदवारांना चकित केलंय. राजकारणाच्या समीकरणात कितीही नाराजी असली, तरी नवा डाव खेळला जातो, तसंच काहीसं भाजपनं केलंय. सरोजिनी नगरच्या सीटवर पती दयाशंकर सिंह आणि पत्नी स्वाती सिंह हे दोघेही तिकीटासाठी दावा करत होते. परंतु, भाजपनं दोघांचंही तिकीट कापून ईडीचे माजी संचालक राजेश्वर सिंह (Rajeshwar Singh) यांना तिकीट दिलंय. राजेश्वर सिंह हे लखनौ रेंजच्या आयजी लक्ष्मी सिंह यांचे पती आहेत.
हेही वाचा: 40 वर्षाच्या प्रियकरासोबत 24 वर्षाच्या मुलीनं पळून जाऊन केलं लग्न
आपल्या परखड विधानांसाठी प्रसिद्ध असलेले कायदा मंत्री ब्रिजेश पाठक यांची लखनौ कॅन्टमधून जागा बदलली आहे. खासदार रीटा बहुगुणा जोशी या त्यांचा मुलगा मयंक जोशी याच्यासाठी जागेची मागणी करत होत्या. तसेच यादव घराण्याची धाकटी सून अपर्णा यादव यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, भाजपनं (BJP) नवा डाव आखत या जागेवर ब्राह्मण मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेत त्यांचं तिकीट कापलंय. या जागेवर सपानं राजू गांधी यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळं आपल्या मुलाचं तिकीट कापल्यानं भाजप खासदार कोणता निर्णय घेणार हे लवकरच समजणार आहे. शिवाय, मयंक जोशी सपाकडूनही निवडणूक लढवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही म्हंटलं जातंय.
हेही वाचा: प्रभासचा Radhe Shyam चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित
लखनौच्या उत्तर सीटवर सपानं पूजा शुक्ला यांना डावलून आश्चर्यचकित केलंय. चार वर्षांपूर्वी सीएम योगी आदित्यनाथ यांना काळे झेंडे दाखवून पूजा शुक्ला प्रसिद्धीच्या झोतात आली होती. या जागेवर माजी मंत्री अभिषेक मिश्रा यांचं तिकीट कापून पूजा शुक्ला यांना तिकीट देण्यात आलंय. शिवाय, भाजपनं जुने आमदार नीरज बोरा यांच्यावरचा विश्वास दृढ केलाय. लखनौ पूर्वेतून भाजपनं मंत्री आशुतोष टंडन यांना उमेदवारी दिलीय. आज समाजवादी पक्षानं आणखी एक यादी जाहीर केलीय. यामध्ये नुकतेच भाजपचा राजीनामा देऊन सपामध्ये दाखल झालेले स्वामी प्रसाद मौर्य यांना फाजिलनगर, पल्लवी पटेल यांना कौशांबीच्या सिराथू मतदारसंघातून आणि अभिषेक मिश्रा यांना लखनऊच्या सरोजिनी नगर मतदारसंघातून तिकीट देण्यात आलंय. पल्लवी ही अपना दल (कम्युनिस्ट) अध्यक्ष कृष्णा पटेल यांची धाकटी मुलगी आणि केंद्रातील मंत्री अनुप्रिया यांची धाकटी बहीण आहे.
Web Title: Up Election Bjp Declares Candidates List Not Given Ticket To Swati Singh And Aparna Yadav Mayank Joshi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..