Election Results 2022 : कांशीराम यांनीजे कमावलंते मायावतींनी गमावलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

up election 2022 mayawati bsp

UP Election 2022 : कांशीराम यांनीजे कमावलंते मायावतींनी गमावलं

UP Election Results 2022 : पाच राज्यातील निवडणूकांचे विश्लेषण करायचे झाल्यास बसपाचा ग्राफ वेगाने खाली येताना दिसतोय. राजकीय तडजोडी, जमीनीवरच्या आंदोलनापासून घेतलेली फारकत, मायावती यांचा विचित्र स्वभाव, स्वत:चे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी तळागळातील असंख्य कार्यकर्ते आणि नेत्यांना पक्षाबाहेर हाकलून देण्याच्या आपल्या स्वभावामुळे उत्तर प्रदेशात तीनदा सरकार स्थापन करणाऱ्या मायावती यांचा पक्ष आपले अस्तित्व गमावत असल्याचे चित्र आहे. यंदाच्या निवडणुकीतही मायावतींच्या पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागलाय. (Mayawati BSP analysis)

उत्तर प्रदेशमधील ४०३ जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडले. देशभराचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झालाय. यात भाजपाने पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली तर दुसरीकडे बसपाच्या राजकीय भवितव्यावरच प्रश्न उपस्थित होतायंत. बसपाची पिछेहाट, त्यामागील कारणे आणि परिणाम याचा आढावा घेऊयात..

बसपाची यापूर्वीच्या निवडणुकीतील कामगिरी

१९८४ मध्ये कांशीराम यांनी बहुजन समाज पक्षाची स्थापना केली. उत्तर प्रदेशच्या राजकारणात बसपाने छाप सोडली. उत्तर प्रदेशात बहुजन समाजाकडे आक्रमक नेता नव्हता. ही पोकळी कांशीराम यांनी भरुन काढली. कांशीराम हे मायावतींचे मार्गदर्शक होते. २००६ मध्ये कांशीराम यांचे निधन झाले आणि त्यानंतर मायावतींनी पक्षाची धूरा सांभाळली. २००७ मध्ये बसपाने मुसंडी मारली. मायावती मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. मात्र, त्यानंतर मायावतींच्या नेतृत्वाखाली पक्षाची पिछेहाट झाल्याचे दिसते.

Uttar Pradesh Election Results

Uttar Pradesh Election Results

बसपा आणि निवडणूक : 10 मुद्दे

  • - यूपीच्या राजकारणात बसपा वेगाने बेदखल होत चाललाय

  • - उत्तराखंड,पंजाबमध्ये बसपाने यापुर्वीचं अस्तित्व गमावलंय.

  • - युपी निवडणूकांच्या आखाड्यात पक्ष यावेळी उतरलाचं नाही

  • - मतदानाचे विश्लेषण केल्यास बसपने भाजपला मदत केल्याचे स्पष्ट

  • - यावेळी केवळ बसपाला 12 टक्क्याच्या आसपास मतं

  • - भविष्यात यूपीच्या राजकारणात नव्याने उभारी घेणे बसपाला कठीण

  • - कांशीराम यांनी मेहनतीने उभी केलेली एक मजबूत सामाजिक न्यायाची चळवळ अस्तंगत होतेय

  • - बसपाची पीछेहाटीमुळे दलित चळवळीला मोठा सेटबॅक

  • - कांशीराम यांनी जे कमावलं ते मायावती यांनी लाँग टर्ममध्ये गमावलंय

  • - वैयक्तिक स्वार्थापोटी किंवा अड्चणीपोटी सशक्त दलित चळवळ संपवणारी महिला म्हणून मायावती यांची नोंद घेतली जाईल.

Web Title: Up Election Why Mayawati Lost Bsp Kanshiram 2007 To 2022 Analysis

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top