PM मोदी म्हणतात, योगींच्या काळात माफिया स्वत:हून तुरुंगात गेलेत आणि आता...

PM मोदी म्हणतात, योगींच्या काळात माफिया स्वत:हून तुरुंगात गेलेत आणि आता...

लखनऊ: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमधील निवडणुकीसाठी प्रचारसभा घेतली आहे. बिजनौरमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलताना त्यांनी समाजवादी पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. या सभेत त्यांनी महिलांची सुरक्षितता, गुन्हेगारी आणि यूपीचा विकास या विषयांवर भाष्य करत योगी आदित्यनाथांचं (Yogi Adityanath) तोंडभरुन कौतुक केलं आहे. (Narendra Modi)

PM मोदी म्हणतात, योगींच्या काळात माफिया स्वत:हून तुरुंगात गेलेत आणि आता...
अखिलेश यांच्यासमोरच जिल्हा अध्यक्षांवर उगारला हात; भरसभेत फुटलं हसू

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मुख्यमंत्री योगींच्या काळात गुन्हेगार स्वत:चं तुरुंगात गेले आणि डांबून घेण्याची इच्छा व्यक्त केली. वर्षानुवर्षे ते या निवडणुकांची वाट पाहत आहेत. त्यांना एकच आशा आहे, की लवकरच निवडणुका येतील आणि सरकार बदलेल जेणेकरून ते तुरुंगातून बाहेर येतील, असा दावाही मोदींनी केला आहे. (UP Assembly Election 2022)

पुढे त्यांनी म्हटलंय की, याआधी महिलांचा विनयभंग होणं ही सर्वसामान्य बाब होती. परिस्थिती इतकी वाईट होती की, एखाद्या महिलेची चैन खेचली गेली तर लोक आपण किमान जिवंत तरी आहोत, म्हणून आभार मानायचे. या सगळ्या भीतीपासून मुख्यमंत्री योगींनी महिलांना मुक्त केलं आहे. आम्हीच खऱ्या अर्थाने महिलांना सन्मान बहाल केला आहे.

PM मोदी म्हणतात, योगींच्या काळात माफिया स्वत:हून तुरुंगात गेलेत आणि आता...
'हातपाय तोडायला सांगितले, त्यामुळे आता राज्यपालांना..' सोमय्या संतापले

याआधी यूपीच्या विकासाच्या नदीतील पाणी एकप्रकारे आटले होते. खोट्या 'समाजवादी' आणि त्यांच्या जवळच्या लोकांमध्ये ते तुंबलं होतं. या लोकांना सामान्य माणसाच्या विकासाची, प्रगतीची, दारिद्र्यमुक्तीच्या तहानेशी काही देणेघेणे नव्हते. पुढच्या २५ वर्षात, जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळून १०० वर्षे पूर्ण होणार आहेत, तेव्हा यूपीने आपल्या विकासामध्ये वेगळा ठसा उमटवावा, अशी आमची इच्छा आहे. येथील व्यापारी, उद्योजक, शेतकरी यांना सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी आमचे सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे, असंही मोदींनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले की, त्यांनी आजवर फक्त स्वतःच्या आणि जवळच्या लोकांची तहान भागवण्याचं काम एवढंच केलंय. ते स्वतःच्या तिजोरीची तहान भागवत राहिले. या स्वार्थी प्रवृत्तीने विकासाच्या नदीच्या सर्व प्रवाहांना आटवून टाकलेलं होतं, अशी कडाडून टीकाही त्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com