
भाजपच्या विजयानंतर मुलायम यांच्या धाकट्या सूनेचे दोन ओळीत ट्विट
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल पूर्णपणे स्पष्ट झाले आहेत. भाजपने अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाचा सरळ लढतीत पराभव केला. भाजप २६२ जागांवर आघाडी घेऊन सरकार स्थापन करणार आहे, तर समाजवादी पक्ष १३५ जागांवर घसरला आहे. भाजपच्या या विजयावर मुलायमसिंह यादव यांची धाकटी सून आणि नुकत्याच भाजपमध्ये दाखल झालेल्या अपर्णा यादव या चांगल्याच खूश आहे.
अपर्णा यादव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त करीत रामराज्य येण्याची आशा व्यक्त केली. ‘ताज पुन्हा बाबांची शोभा वाढवणार आहे. आएगा राम राज्य जय श्री राम’ असे ट्विट अपर्णा यादव यांनी केले आहे. निवडणुकीदरम्यान अपर्णा यादव सपा (samajwadi party) सोडून भाजपमध्ये दाखल झाल्या. अपर्णा यादव (Aparna Yadav) सपामध्ये असल्यापासून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फॅन आहे.
भाजपने (BJP won) अपर्णा यादव यांना तिकीट दिले नाही. त्यांच्याकडे प्रचाराची जबाबदारी दिली होती. अपर्णा यादव यांनी उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) अनेक जिल्ह्यांमध्ये डझनभर सभा घेतल्या आणि पक्षाच्या प्रचारात व्यस्त होत्या. अपर्णा यादव यांनी योगी आदित्यनाथ यांना भाऊ म्हटले आहे. अपर्णा यांचा भाजपमध्ये प्रवेश अखिलेश यादव यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात होता.
Web Title: Uttar Pradesh Assembly Election Bjp Won Aparna Yadav Samajwadi Party
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..