
UP Poll Results : निकालादरम्यान तणावपूर्ण स्थिती; बसपा कार्यकर्त्याला हार्टअटॅक!
नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे (UP Election) निकाल हाती यायला लागले आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेश मतमोजणी केंद्रावरच बहुजन समाज पार्टीच्या (BSP) एका कार्यकर्त्याला हार्ट अटॅक आला. गाझियाबादमधील शहर विधानसभा मतमोजणी केंद्रावर हा प्रकार घडला आहे. अंकीत यादव असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. (Uttar Pradesh Poll Result 2022 BSP Worker Heart Attack on the Voting Centre)
हेही वाचा: पंजाबमध्ये 'आप आये बहार आई' गाणं वाजण्यामागची पाच कारणं...
गाझियाबाद शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अतुल गर्ग, काँग्रेसचे सुशांत गोयल, बसपाचे कृष्ण कुमार आणि समाजवादी पार्टीनं विशाल वर्मा यांना मैदानात उतरवलं होतं. सन २०१७ मध्ये या जागेवर भाजपच्या अतुल गर्ग यांनी विजय नोंदवला आहे.
५४.९२ टक्के झालं मतदान
दरम्यान, या निवडणुकीत गाझियाबाद जिल्ह्यात ५४.९२ टक्के मतदान पार पडलं. यामध्ये सर्वाधिक मतदान मोदीनगरमध्ये पार पडलं. तर सर्वात कमी मतदान साहिबाबादमध्ये झालं. गाझियाबादमध्ये ५१.५७ टक्के, लोनीमध्ये ६१.४९ टक्के, मोदी नगरमध्ये ६७.२६ टक्के, मुरादनगरमध्ये ५९.७२ टक्के, साहिबाबादमध्ये ४७.०३ टक्के मतदान झालं आहे.
Web Title: Uttar Pradesh Poll Result 2022 Bsp Worker Heart Attack On The Voting Centre
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..