esakal | पंचवीस हजार हेक्टरवर सोयाबीनची दुबार पेरणी, कृषी विभाग अनभिज्ञ; पीककर्जापासून नाही अनेक शेतकरी वंचित
sakal

बोलून बातमी शोधा

akola buldana Double sowing of soybean on 25,000 hectares, Department of Agriculture ignorant; Not many farmers are deprived of crop loans

जिल्ह्यातील सुमारे 25 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची दुबार पेरणी करण्यात आली आहे. कृषी विभागाने मात्र या संदर्भात निश्चित आकडेवारी उपलब्ध नसून एवढ्या क्षेत्रावर पेरणी झाली नसल्याचे म्हटले आहे.

पंचवीस हजार हेक्टरवर सोयाबीनची दुबार पेरणी, कृषी विभाग अनभिज्ञ; पीककर्जापासून नाही अनेक शेतकरी वंचित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

बुलडाणा : जिल्ह्यातील सुमारे 25 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची दुबार पेरणी करण्यात आली आहे. कृषी विभागाने मात्र या संदर्भात निश्चित आकडेवारी उपलब्ध नसून एवढ्या क्षेत्रावर पेरणी झाली नसल्याचे म्हटले आहे.


मृग नक्षत्राचा पाऊस पडल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या पेरणीला लगोलग सुरुवात केली. अनिश्चित स्वरुपाचा पाऊस व निकृष्ट दर्जाचे बियाणे यामुळे अनेक ठिकाणी सोयाबीनची उगवणच झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांचे हजार रुपयांचे बियाणे व खते वाया गेली. 25 टक्‍क्‍यांपेक्षा कमी बियाणे उगवल्याने शेतकऱ्यांनी नाईलाजाने या उगवलेल्या सोयाबीनला वखरणी करून काढून टाकले. यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांसमोर उभे राहिले. आधीच अडचणीत असलेला शेतकरी या वर्षी पीक कर्जासाठी सुद्धा बँकांच्या चचकरा मारून त्रस्त झालेला असताना दुबार पेरणीचे हे संकट शेतकऱ्यांच्या जीवाशी आले आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

कृषी विभाग म्हणतो निश्‍चित माहिती नाही
ठिकाणच्या माहितीनुसार जिल्हाभरातील सुमारे 25 हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली आहे मात्र या दुबार पेरणी संदर्भात कोणतीही आकडेवारी कृषी विभागाकडे उपलब्ध नाही. मात्र शेतकऱ्यांनीही आपण दुबार पेरणी केली असल्याची माहिती कृषी विभागाकडे देणे आवश्यक आहे.

निश्चित आकडा नाही जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोयाबीनची दुबार पेरणी झालेली असल्याची माहिती आहे. मात्र निश्‍चित किती क्षेत्रावर झाली हे आताच सांगता येणार नाही. अनेक शेतकऱ्यांच्या बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी देखील आलेल्या आहेत.
-नरेंद्र नाईक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलडाणा.

loading image