रासायनिक खताच्या किमतीने उद्धभवला दुष्काळात तेरावा महीना

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 3 July 2020

रासायनिक खतांच्या किमती भरसाठ वाढल्याने खरीप हगामाच्या नियोजणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. खरीप हंगामाचे नियोजन चालु असताना कृषी केंद्र चालकाकडे अपुरा साठा उपलब्ध असल्याने मिळेल ते खत नाईलाजास्तव खरेदी करावे लागत असल्याचे शेतकरी सांगत आहे.

टूनकी (जि.बुलडाणा) ः रासायनिक खतांच्या किमती भरसाठ वाढल्याने खरीप हगामाच्या नियोजणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. खरीप हंगामाचे नियोजन चालु असताना कृषी केंद्र चालकाकडे अपुरा साठा उपलब्ध असल्याने मिळेल ते खत नाईलाजास्तव खरेदी करावे लागत असल्याचे शेतकरी सांगत आहे.

गेल्या पाच वर्षांपासून रासायनिक खतांच्या किमतीत वाढ होत आहे. खताची भाव वाढत असताना शेती मालाच्या भावाचे हित शासनाने जोपासायला हवे. शेती व्यवसाय नकोच अशी धारणा शेतकऱ्यांची आहे मात्र, नाईलाजाने शेती करावी लागते. अशा वेळी शेतकऱ्यांच्या भावना व कष्ट डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यावा, अशी भावना शेतकऱ्यामधे व्यक्त होत आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

सततच्या दुष्काळाने शेतकरी होरपळून निघाला आहे. अशावेळी शेतीची मशागत करून पिकाची व उत्पादनाची वाढ व्हावी यासाठी शेतकरी रात्र दिवस शेतीत राब - राब राबत असते . पेरणीच्या वेळी खताची टंचाई निर्माण होईल, असे गृहित धरून बँक व सेवा सोसायटी यांच्याकडून कर्ज घेऊन ही रासायनिक खते खरेदी करतात. यावर्षी खताच्या किमती वाढल्याने कर्जातही वाढ करावी लागली आहे. म्हणजेच व्याजाचा बोजा देखील शेतकऱ्यांवर जास्तीचा बसला आहे. खरीप हंगामाच्या मशागतीला तालुक्यात वेग आला आहे. आसमानी संकट , दुबारा पेरणी मुळे आधीच शेतकरी हवालदिल झालेला आहे तर दुसरीकडे यावर्षी रासायनिक खताचे दर वाढलेले असल्याने शेतकरी धास्तावला आहे.

पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे बिघडले गणित
पावसाच्या लहरीपणामुळे मागील पाच वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, उत्पादनात मोठी घट झाली आहे. यातच गेल्या वर्षीपासुन खताचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. दळन वळणा करिता महत्वाचे साधन असणारे इंधनाचे दर दिवसा गणिक नवे उच्चांक प्रस्थापित करत असताना, पाठोपाठ खतांच्या किमतीही गगनाला भिडल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. दुष्काळामुळे वाढणारे कर्ज, मातीमोल भावाने विकला जाणारा शेतीमाल, दुबारा पेरणी त्यातच खतांची दरवाढ झाल्यामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक शोषण सुरु आहे. शाशणाने शेतकऱ्यांचा परिस्थीतीचा विचार करुण रासायनिक खताच्या किमती कमी करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

सतत पडणाऱ्या दुष्काळाचा विचार करता शेतकऱ्यांवर खताच्या वाढीव किमतीचा बोजा न परवडणारा आहे. लहरी स्वरूपाचा पाऊस, दुबारा पेरणी शेतकरी सर्व बाजुने अडचणीत आहे. अशा वेळी शेतीची मशागत करणे देखील शेतकऱ्याला न परवडणारे आहे. आज स्थितीत शेतकऱ्यास कोणीही उधार देत नाही. कर्जमाफी रखडल्यामुळे , सावकाराकडे हात पसरविणे याशिवाय खत व बियाणे खरेदी होऊ शकत नाही. अशा सर्व परिस्थितीचा शासनाने विचार करावा आणि वाढलेल्या खताच्या किमती कमी करणे गरजेचे आहे.
-अतुल राहाणे, शेतकरी टूनकी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola buldana Thirteenth month of drought caused by the price of chemical fertilizers