राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला मिळणार गती, लॉकडाउन व कंत्राटदार बदलल्याने रखडले होते काम

akola buldana Work was stalled due to speeding, lockdown and change of contractor for four-laning of National Highway
akola buldana Work was stalled due to speeding, lockdown and change of contractor for four-laning of National Highway

नांदुरा (जि.बुलडाणा) ः कित्येक दिवसापासून रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा च्या चौपदरीकरणाच्या कामाला येत्या ऑक्‍टोबरपासून सुरुवात होणार असून त्यासाठीच्या हजार कोटी रुपयांच्या कामाच्या निविदेला मंजुरात मिळाली असून तसा कंपन्यासोबत करारही पूर्ण झाल्याने रखडलेल्या रस्त्याचे ग्रहण लवकरच सुटणार आहे.लॉगडाऊन व कंत्राटदारांनी काम सोडल्याने या कामाला अनेक दिवसांपासून पूर्णविराम भेटल्याने वाहतुकीची चांगलीच कोंडी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले होते.


यूपीए शासनाच्या कार्यकाळात एल अँड टी कंपनीने सोडलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम मोदी शासनाच्या कार्यकाळात इन्फ्रास्ट्रक्‍चर लिजिंग अँड फायनान्शियल सर्विसेस कंपनीला देण्यात आले होते.निधी व बॅंक लोन तसेच इतर तांत्रिक अडचणीमुळे हे काम सोडल्याने अर्धवट झालेल्या या रस्त्यामुळे वाहनचालकांची ऐन पावसाळाकाळात चांगलीच पंचाईत झाली होती इतर वेळेसही अर्धवट कामांमुळे अपघाताची संख्या वाढली व पर्यायाने वाहतुकीची कोंडीच होत गेली आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

या रस्त्याच्या आतापर्यंतच्या झालेल्या कामात खोदकामच जास्त झाल्याने इतर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.अमरावती ते चिखली (मलकापूर) चौपदरीकरणाच्या कामासाठी चार कंपन्यांची नियुक्ती झाली असून, एका कंपनीसमवेत करार पूर्ण झाला तर उर्वरीत करार दिवसात पूर्ण होणार आहे. कामाच्या चार टप्प्याच्या चार निविदा तीन कंपन्यांना मंजूर झाल्या आहेत.पहिला टप्पा अमरावती ते कुरणखेड,दुसरा टप्पा कुरणखेड ते अकोला शहर,या दोन्ही टप्प्याची निविदा राजपत इन्फ्रा या कंपनीला मंजूर झाली असून तिसऱ्या अकोला ते नांदुरा निविदा मोंटे कार्लो कंपनी तर नांदुरा ते चिखली दरम्यानच्या चौथ्या टप्प्यासाठी कल्याण टोल्स या कंपनीला निविदा मंजूर झाली आहे.

तीन टोल नाके असणार,त्यातील एक दसरखेड(मलकापूर)येथे
महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातच टोल नाक्‍यांच्या इमारत उभारणीचा समावेश असणार आहे. अमरावती ते चिखली(मलकापूर) या सुमारे किलोमीटर पर्यंतच्या अंतरात कुरणखेड,तरोडा कसबा आणि दसरखेड येथे हे टोलनाके असणार आहेत.

"राष्ट्रीय महामार्गाचे काम लांबल्यामुळे रहदारीस वेळोवेळी खोळंबा होत असल्याने तसेच अपघाताचे प्रमाणही वाढत असल्याने हा मार्गाचे काम त्वरित करावे अशी मागणी वेळोवेळी मी स्वतः मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यासोबत केली आहे.अधिवेशनातही माझ्यासोबत इतरांनीही हा मुद्दा उपस्थित केला असल्याने आमच्या सर्वांच्या प्रयत्नाला यश आले आहे."
-राजेश एकडे,आमदार,मलकापूर विधानसभा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com