अरे हे काय?  व्हिडिओ क्लिप काढून करत होता ब्लॅकमेल, एका महिलेसह तिघांना...

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 1 July 2020

शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्या नंतर चित्रफीत काढून २५ लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल करणे एका महिलेसह तिघांना चांगलेच भोवले. मंगळवारी (ता.३०) रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून तिघांना अटक केली आहे. आरोपीना न्यायालयाने चार जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान व्हिडिओ क्लीप काढून २५ लाखाच्या मागणीसाठी ब्लॅकमेल करण्याचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

देऊळगाव राजा (जि.बुलडाणा) ः शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्या नंतर चित्रफीत काढून २५ लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल करणे एका महिलेसह तिघांना चांगलेच भोवले. मंगळवारी (ता.३०) रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून तिघांना अटक केली आहे. आरोपीना न्यायालयाने चार जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान व्हिडिओ क्लीप काढून २५ लाखाच्या मागणीसाठी ब्लॅकमेल करण्याचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, एक महिला व तिचे दोन साथीदार चित्रफीत काढून २५ लाख रुपये द्या म्हणून ब्लॅकमेल करत होते. यातील आरोपी महिलेने फिर्यादीस शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले व चित्रफित काढून घेतली होती. तर तिघांनी संगणमत करून पैशाच्या मागणीसाठी मानसिक त्रास देणे सुरू केले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविण्यात आली होती. सदर तक्रारीनंतर ३० जून रोजी शहरातील बायपास रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचला दरम्यान फिर्यादीने आरोपींशी संपर्क करून काही रक्कम देण्याचे सांगून बायपास रस्त्यावर बोलवले आणि गुन्हे शाखेच्या पथकाने एक महिला व दोन युवकांना ताब्यात घेतले सदर प्रकरणात फिर्यादी राजेंद्र गजानन बैरागी (वय ५१ रा. भिवगाव तालुका देऊळगाव राजा) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रोहिनी नितीन पवार राहणार जालना,राहुल सर्जेराव गाडेकर राहणार भिवगाव व सचिन दिलीप बोर्डे राहणार वाघरळ (जिल्हा जालना) या तिघांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ चे कलम ६६ ई , खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक केली.

स्थानिक गुन्हे शाखेने सदर प्रकरण देऊळगाव राजा पोलिसांकडे वर्ग केल्यानंतर पोलिसांनी आज तिघा आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार जुलै पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश सुनावले आहे सदर प्रकरणात ठाणेदार संभाजी पाटील तपास करीत आहेत.

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Excitement by removing the video clip and blackmail type