esakal | आजाराची दिली खोटी माहिती, नांदुरा शहरात खासगी वाहनचालक...
sakal

बोलून बातमी शोधा

akola news False information given about the disease, private drivers in Nandura city ...

प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे उपचारासाठी गेलेला तरुणाने माहिती लपवल्याप्रकरणी नांदुरा तहसीलदार राहुल तायडे यांच्या फिर्यादीवरून सदर 28 वर्षे तरुणाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

आजाराची दिली खोटी माहिती, नांदुरा शहरात खासगी वाहनचालक...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

नांदुरा (जि.बुलडाणा) ः प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे उपचारासाठी गेलेला तरुणाने माहिती लपवल्याप्रकरणी नांदुरा तहसीलदार राहुल तायडे यांच्या फिर्यादीवरून सदर 28 वर्षे तरुणाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

याबाबत साथरोग प्रतिबंध कायदा1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, महाराष्ट्र शासन यांचे आदेश दिनांक 31 मे 2020, विद्यमान जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बुलढाणा यांचे ऑफिस ऑफ द डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऍड चेअर पर्सन डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी बुलढाणा दिनांक 1 जून 2020, डॉक्टर चेतन बेडे मेडिकल ऑफिसर नांदुरा, या सर्व संदर्भावरून नांदुरा आठवडी बाजार येथील हा रुग्ण म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे उपचाराकरिता दिनांक 26 जून 2020 रोजी ओपीडी मध्ये आला होता,

त्याचा व्यवसाय खाजगी वाहन चालक असून, त्याला पंधरा दिवस बाहेर बाहेरगावी कुठे गेला होता काय झाले असे विचारले असता त्यांनी बाहेरगावी कुठेही न गेल्याचे सांगितले , कोठेही वाहन न चालविल्याचे सांगितले म्हणून त्याच्या रक्ताचा नमुना नुसार टायफाईड असल्यामुळे उपचारांमध्ये इंजेक्शन सात दिवस देण्यास सांगितले, सदर रुग्ण चेहऱ्यावर मास्क सुद्धा बांधत नव्हता व सामाजिक अंतरचे वारंवार उल्लंघन करीत होता, त्याला उपचारासाठी आणले असता त्याला ताप आल्याचे सांगून सात दिवसापूर्वी दिनांक 20 जून रोजी ते 21 जून रोजी दरम्यान खंडवा प्रवास केल्याचे तसेच सुरतला दोन दिवसापूर्वी गेल्याचे सांगत होता, त्याचा ताप दोन दिवस इंजेक्शन देऊनही कमी न होणे, श्वास घ्यायला त्रास होत असल्याने covid-19 ची तपासणी 28 जून रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे संदर्भित केले, मात्र त्यांनी दिलेल्या खोट्या प्रवासाच्या माहितीमुळे दवाखान्यातील डॉक्टर,नर्सेस,मेडीकल स्टाफ तसेच कोविड 19 प्रादुर्भाव असणाऱ्या ठिकाणावरून आल्यानंतर घरी विलगीकरण न झाल्यामुळे समाजाला कोविड19 चा प्रादुर्भाव होण्यास कारणीभूत ठरतो.त्याअनुषंगाने खोटी माहिती दिल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत व समाजाला धोक्यात टाकण्याच्या अनुषंगाने त्यावर नियमानुसार गुन्हा दाखल करावा असे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.