Video : ‘बसंती’साठी चढला विरू टॉवरवर....

अरूण जैन 
शुक्रवार, 10 जुलै 2020

शोले सिनेमात विरू बसंतीसाठी टाकीवर चढण्याचा प्रसंग तुम्हाला आठवत असेलच. तुम्हाचा विश्‍वास बसणार नाही मात्र अशीच एक घटना सत्यात घडली आहे. 

बुलडाणाः शोले सिनेमात विरू बसंतीसाठी टाकीवर चढण्याचा प्रसंग तुम्हाला आठवत असेलच. तुम्हाचा विश्‍वास बसणार नाही मात्र अशीच एक घटना सत्यात घडली आहे. 

जवळच असलेल्या सव येथील एक युवक बीएसएनएल'च्या सुमारे तीनशे फूट उंच टॉवर वर चढला आहे. गेल्या तीन तासापासून त्याने प्रशासनाला वेठीस धरले असून सर्वत्र या प्रकाराची चर्चा चालत आहे. प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील या गावातील गजानन रोकडे हा युवक अचानक बीएसएनएलच्या टॉवरवर चढला अनेकांनी प्रयत्न करूनही तो खाली उतरायला तयार नाही. 

 

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्याची पत्नी भांडण करते व माहेरी निघून गेली. त्यामुळे ती येईपर्यंत उतरणार नसल्याची चर्चा घटनास्थळी होती. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. काही काळ त्याने मोबाईल वरून लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर त्याने मोबाईलही खाली फेकून दिला. त्यामुळे आता हा वीरू कधी खाली उतरतो आणि बसंती केव्हा येते. 

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Viru climbed the tower for Basanti ... Husband experimented for his wife