शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती आवळतोय सावकारी फास, केवळ 30 टक्के पीक कर्जाचे वाटप; दुबार पेरणीने संकटात भर

akola washim Lending traps around farmers' necks, allocating only 30 per cent crop loans; Double sowing adds to the crisis
akola washim Lending traps around farmers' necks, allocating only 30 per cent crop loans; Double sowing adds to the crisis

वाशीम  ः यावर्षी मॉन्सूनचे आगमण लवकर झाले आहे. परिणामी पेरणी सुध्दा लवकर सुरू झाली. मात्र यावर्षी पेरणीसाठी शेतकर्यांना सावकाराचे उंबरठे झिजवावे लागले आहेत. पिककर्ज वाटपाची गती अतिशय धिमी असल्याने शेतकरी सावकाराच्या जाळ्यात सापडला आहे. जिल्ह्यामध्ये केवळ 30 टक्के पीककर्ज वाटप झाले असल्याने 70 टक्के शेतकरी सापळ्यात सापडला असतांना 15 हजार हेक्टरवरील दुबार पेरणीने परिस्थिती चिंताजनक झाली आहे.

पीककर्ज माफिचा घोळ सुरू असताना कोरोनाने शेतकऱ्यांचे भावविश्व उद्‍ध्वस्त केले होते. शेतमालाला गिर्हाईकच नसल्याने भाजीपाला, फळे व कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मेहनत मातीमोल झाली होती. मात्र पीक कर्जावर पेरणी करता येईल या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्याचा मात्र प्रशासनाच्या दूर्लक्षाने भ्रमनिरास झाला. निसर्गानेही यावर्षी मॉन्सूनचा प्रवास गतीमान केला. हातात पैसा, नाही शेत पेरणीयोग्य झाल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने खाजगी सावकाराच्या दारात जावे लागले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

दामदुप्पट व्याजाने पैसे घेवून पेरणी तर केली मात्र एका महिन्यानंतरही पीककर्ज मिळत नसल्याने आता कर्जाची व्याजासहीत परतफेड करावी कशी हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत फक्त 30 टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप झाले आहे. 70 टक्के शेतकरी अजूनही पिककर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. हीच परिस्थिती कायम राहीली तर जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढण्याची भिती आहे.

राष्ट्रीयकृत बँकेची नकारघंटा
जिल्ह्यामधे वाटप झालेल्या पीक कर्जापैकी 70 टक्के पीककर्ज एकट्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने वाटप केले आहे. आतापर्यंत जे शेतकरी राष्ट्रीयकृत बँकेचे सभासद होते त्यांनासुध्दा राष्ट्रीयकृत बॅकांनी झुलवत ठेवले आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बॅंका जिल्हाधिकारी यांचे आदेश जुमानत नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रीयकृत बॅंकांनी वाटप केलेल्या पीककर्जाची टक्केवारी केवळ 4 टक्के आहे.

खिसा रिकामा, शिवार उजाड
एकीकडे सावकाराचा फास गळ्यात घेवून पेरणी तर केली मात्र, बोगस बियाण्याने पेरलेले बियाणे उगवलेच नाही. जिल्ह्यामध्ये 15 हजार हेक्टरवरील दुबार पेरणीने परिस्थिती चिंताजनक झाली आहे. आता खिसा रिकामा शिवार उजाड तर पीककर्जाचा पत्ता नाही. या भयाण परिस्थितीला बदलले नाही तर, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढण्याची भिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com