esakal | तीन कॉंग्रेस नगरसेवकांसह भाजपा, राष्ट्रवादी व वंचित पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

BJP, NCP and deprived party office bearers and activists join Shiv Sena along with three Congress corporators

शिवसैनिकाचा कोणताही धर्म नाही आणि कोणतीही जात नाही. शिवसेना हाच त्यांचा धर्म व जात आहे. असे प्रतिपादन खासदार प्रतापराव जाधव यांनी केले. येथील आमदार संजय गायकवाड यांच्या मातोश्री कार्यालयात मोताळ्याच्या तिन कॉंग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांसह भाजपा, राष्ट्रवादी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जे जुने शिवसैनिकांनी वंचित सोबत गेले होते त्यांची घरवापसी करण्यात आली.

तीन कॉंग्रेस नगरसेवकांसह भाजपा, राष्ट्रवादी व वंचित पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

बुलडाणा  ः शिवसैनिकाचा कोणताही धर्म नाही आणि कोणतीही जात नाही. शिवसेना हाच त्यांचा धर्म व जात आहे. असे प्रतिपादन खासदार प्रतापराव जाधव यांनी केले. येथील आमदार संजय गायकवाड यांच्या मातोश्री कार्यालयात मोताळ्याच्या तिन कॉंग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांसह भाजपा, राष्ट्रवादी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जे जुने शिवसैनिकांनी वंचित सोबत गेले होते त्यांची घरवापसी करण्यात आली.


यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, उपजिल्हाप्रमुख भोजराज वाघ, तालुका प्रमुख लखन गाडेकर, मोताळा तालुका प्रमुख रामदास चौथनकर, बाळासाहेब नारखेडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
पुढे बोलतांना खा. प्रतापराव जाधव म्हणाले की, अनेक जुन्या शिवसैनिकांनी शिवसेना पक्ष वाढविण्याकरीता रक्ताचे पाणी केले. आज ते प्रवाहाच्या बाजुला गेले होते. तर अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गले होते. त्या सर्व शिवसैनिकांनी आज घरवापसी केली आहे. शिवसेनेत जात, धर्म पाळल्या जात नाही. शिवसैनिकाचा एकच धर्म व जात आहे ती म्हणजे शिवसेना. तर प्रास्तावीक मध्ये आ. संजय गायकवाड म्हणाले की, शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. या ठिकाणी जो कार्यकर्ता काम करेल तोच मोठा होतो. पैसा किंवा राजकीय वारस या पक्षात लागु होत नाही. म्हणून माझ्यासारखा सामान्य शिवसैनिक आज आमदार झाला आहे.


शिवसेना पक्षात प्रवेश करणाऱ्यामध्ये भाजपा पक्षातील 12 गावातील सरपंच, शाखा प्रमुख, तालुका उपाध्यक्ष, सरचिटणीस, भाजयुचे पदाधिकारी तर राष्ट्रवादी पक्षाचे आठ गावातील सरपंच, उपसरपंच पदाधिकारी तसेच कॉंग्रेस पक्षातील पदाधिकारी यांच्यासह मोताळा नगर पंचायत मधील कॉंग्रेस पक्षाचे माजी नगरराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अनंतराव देशमुख, नगरसेवक सुरेश खर्चे, नगरसेवक शे. मुक्तार शे. गणी, भाजपा युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय नारखेडे, रामभाऊ भंगाळे, संजय वराडे, अतुल पाटील भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुका उपाध्यक्ष, लक्ष्मण इंगळे, संजय बांगर, जीवन जुनारे, अनंता शेळके, अशपाक शहा तुराब शहा, डॉ. भानुदास संपतराव हुंबड, राष्ट्रवादीचे राजू पाटील, प्रमोद चतारे, प्रमोद पाटील, रमेश भोपळे, रा.कॉ.चे अंभोडा येथील उपसरपंच संदीप भुसारी, प्रशांत गाढे, पप्पु सपकाळ, अनिल जगताप, श्रीकृष्ण तायडे, अनिल पाटील बाजार समिती संचालक भाजपा, तालुका सरचिटणीस भाजपा संजय चांदा, प्रतापसींग नाईक, एकनाथ जाधव, संतोष भोंरो, उपसरपंच गोपाल पाटील, माजी तालुका प्रमुख शिवसेना धनंजय बारोटे, गणेश सोनोने, रवी राजपूत, समाधान सपकाळ, गोविंद खुमकर, संजय पालवे मोहम्मद अली मो. ठेकिया, कदीर बादशाह खान, लर्तें चौधरी, नजीर शाह यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. कार्यक्रमाचे संचलन युवा उपजिल्हाप्रमुख प्रविण निमकरडे यांनी केले.