नाकाबंदी कडेकोट तरीही गुटखा घरपोच, तीन दिवसाआड दीड कोटीचा गोरखधंदा; अन्न व औषधीप्रशासनाचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 4 July 2020

राज्यामधे गुटखा व सुगंधीत तंबाखूवर कडक निर्बंध आहेत. वाशीम जिल्ह्यामधे मात्र गुटख्याला मोकळे रान मिळाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सिमा सिल केलेल्या असतांना तीन दिवसाआड दीड कोटीचा गुटखा जिल्ह्यामध्ये येतोच कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाने याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केल्याने लाॅकडाउनमध्ये गुटख्याला अभय मिळाले आहे.

वाशीम  ः राज्यामधे गुटखा व सुगंधीत तंबाखूवर कडक निर्बंध आहेत. वाशीम जिल्ह्यामधे मात्र गुटख्याला मोकळे रान मिळाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सिमा सिल केलेल्या असतांना तीन दिवसाआड दीड कोटीचा गुटखा जिल्ह्यामध्ये येतोच कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाने याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केल्याने लाॅकडाउनमध्ये गुटख्याला अभय मिळाले आहे.

वाशीम जिल्हा कायम गुटख्याच्या अवैध व्यापारात अग्रेसर राहीला आहे. कारंजा गुटख्याचे हब बनले असताना आता वाशीम शहर गुटख्याचे आगार झाले आहे. कारंजा मार्गे होणारी गुटख्याची वाहतूक सुरू असतांना आता पुसद, सावळी, अनसिंग मार्गे गुटख्याची वाहतूक सुरू झाली आहे. हा गुटखा वाशीम शहरामध्ये साठवला जातो. तेथून रातोरात पिकअप वाहनांमधून हा गुटखा मालेगांव, रिसोड, खामगाव डोणगाव, मेहकर येथे पाठविला जातो. अन्न व औषध प्रशासनाने याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केल्याने लाॅकडाउनमध्ये गुटख्याला अभय मिळाले आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

तीन दिवसात दीड कोटी
अमरावती जिल्ह्यामधे दाखल होणारा गुटखा टपाल वाहतूक करणाऱ्या व इतर वाहतूक करणारऱ्या सिलबंद कंटेनरमधून येतो. अवैध गुटखा व्यापारात एक कंटेनरची खेप दीड कोटीची असते. वाशीम जिल्ह्यामधे दर तीन दिवसांनी दीड कोटीचा गुटखा अवैधपणे आणला जातो. वाशीम शहराच्या मध्यवर्ती भागात एका घरात एक कंटेनर साठविला जातो.

मराठवाडा कनेक्शन
अमरावतीवरून वाशीम शहराबरोबरच रिसोड येथेही गुटखा पोचविला जातो. रिसोड तालुक्यातील ग्रामीण भागात महिन्यापूर्वी एसडिपीओ पवन बनसोड यांनी छापा टाकून लाखो रूपयांचा गुटखा जप्त केला होता. या छाप्यानंतर फक्त साठवणूकीचे ठिकाण बदलले आहे. अवैध गुटखा व्यापारात वाढच होत आहे.

वाशीम जिल्ह्यात अवैध गुटखा वर अन्न व औषध प्रशासनाने कारवाया केल्या आहेत. आणखी कारवायांमधे गती देण्यात येईल.
- सागर तेरकर, अन व औषधी प्रशासन अकोला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gutkha home delivery despite blockade tight, Rs 1.5 crore scam in three days; Neglect of food and drug administration