प्रेमीयुगल होते बेपत्ता अन् शेतातच आढळले...

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 2 July 2020

 बुलडाणा जिल्ह्यातील जलंब येथे शेतात प्रेमी युगलाने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बुधवारपासून हे प्रेमीयुगल बेपत्ता होते. आज दोघांचे मृतदेह शेतात आढळून आले.

बुलडाणा :  बुलडाणा जिल्ह्यातील जलंब येथे शेतात प्रेमी युगलाने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बुधवारपासून हे प्रेमीयुगल बेपत्ता होते. आज दोघांचे मृतदेह शेतात आढळून आले.

शेगाव येथील  17 वर्षीय अल्पवयीन युवती आणि युवक हे दोघेही बेपत्ता होते. या तरुणाविरुद्ध शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

बुधवारी दुपारपासून दोघेही फरार झाले होते. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी  शेगाव पोलीस स्टेशनमध्ये मुलाच्या विरोधात तक्रार दिली होती.

त्यानंतर तरोडा  शिवारात या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांचे मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे.  या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.

दरम्यान, दौंड तालुक्यातील बोरीपार्धी गावातील एका व्यक्तीने कोरोना आजारावर मात करीत हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. बोरीपार्धी येथे राहणाऱ्या एका 45 वर्षीय व्यक्तीस 24 जून रोजी कोरोनाची बाधा झाल्याची कोरोना चाचणी अहवालात स्पष्ट झाले होते त्यानंतर त्याच्यावर पिंपरी येथील वाय.सी.एम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यानंतर त्याच्या पत्नीचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला होता तिच्यावरही सध्या उपचार सुरू आहेत.

कोरोनाबाधित व्यक्तीची पुन्हा चाचणी केली असता अहवाल निगेटिव्ह आल्याने त्या व्यक्तीस काल घरी सोडण्यात आले होते. काल रात्री ते बोरीपार्धीतील आपल्या घरी आले आणि आज पहाटे त्यांनी बोरीपार्धी मधील रेल्वे गेटाच्या पूर्व बाजूला रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide by strangulation of missing lover, agitation in bulldozer