
मराठा आरक्षणाचा तिढा सुटत नसल्याने वाशीम तालुक्यातील एका युवकाने विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पवन
वाशीम: मराठा आरक्षणाचा तिढा सुटत नसल्याने वाशीम तालुक्यातील एका युवकाने विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पवन मानिक डुबे असे या युवकाचे नाव असुन त्याच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
मराठा आरक्षण आंदोलन गावखेड्यापर्यंत पोचले आहे. वाशीम जिल्ह्यात मराठा आरक्षण गेल्या आठ दिवसापासून सुरू आहे. आज ता. 30 सायंकाळी सहा वाजता वाशीम तालुक्यातील मोहगव्हाण येथील युवक पवन मानिक डुबे याने विषारी रसायन प्राशन केले. त्याच्या कुटूंबियांना समजताच त्याला तत्काळ वाशीम येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल केला आहे. त्याच्या खिशात मराठा आरक्षणाबाबत चिठ्ठी आढळली आहे.