सुवार्ता! पहिल्याच दिवशी मिळणार विद्यार्थ्यांना पुस्तके

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

पुस्तके पोहोचविण्याकरता 1200 रुपये वाहतूक खर्च देण्यात येणार आहे. तालुकास्तरावरून पुस्तकांचे शाळांना वाटप यु-डायसनुसार करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळतील, असे नियोजन करण्यात आले आहे. पुस्तकांचे वितरण समारंभपूर्वक करावे, अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहे.

नागपूर : लॉकडाउनमुळे शाळा नियमित वेळेत सुरू होण्यासंदर्भात शंका व्यक्त करण्यात येत असताना दुसरीकडे शिक्षण विभागाने शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तक देण्याचे नियोजन केले आहे. मागणीनुसार बालभारतीने 8 लाख 73 हजार पुस्तकांचा पुरवठा केला असून तीन तालुक्‍याच्या ठिकाणी त्यांचे वितरणसुद्धा झाले. 

समग्र शिक्षाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना 2020-21 ची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे. 2018-19 च्या युडायस नुसार तालुक्‍याने मोफत पाठ्यपुस्तकांची ऑनलाइन मागणी शिक्षण विभागाकडे केली होती. त्यानुसार वर्ग 1 ते 8 च्या सर्व विषयांच्या पाठ्यपुस्तकांचा पुरवठा तालुकास्तरापर्यंत करण्यात येत आहे. तालुक्‍यात ज्या ठिकाणी पुस्तके उतरविण्यात येणार आहे, त्या ठिकाणी सुरक्षित आणि पुरेशी व्यवस्था कराव्यात, सर्व पाठ्यपुस्तकावर समग्र शिक्षा अभियानाचा स्टॅम्प अनिवार्य आहे. 

हेही वाचा : माकड दोन दिवस होते विहिरीत पडून; शेतकऱ्याने घातले खाऊपिऊ... वाचा पुढे

पुस्तके पोहोचविण्याकरता 1200 रुपये वाहतूक खर्च देण्यात येणार आहे. तालुकास्तरावरून पुस्तकांचे शाळांना वाटप यु-डायसनुसार करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळतील, असे नियोजन करण्यात आले आहे. पुस्तकांचे वितरण समारंभपूर्वक करावे, अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहे. हिंगणा, कळमेश्वर व कामठी तालुक्‍यांत पुस्तकांचे वितरण सुरू झाले आहे. यंदा नागपूर जिल्ह्यातून 8,73,307 पुस्तकांची मागणी बालभारतीकडे करण्यात आली आहे. 

तालुकानिहाय पुस्तकांची मागणी 
नागपूर ग्रामीण-88,224 
उमरेड-67,146 
भिवापूर-39,831 
कुही-59,546 
रामटेक-67,675 
मौदा-56,913 
पारशिवनी-53,199 
काटोल-66,118 
नरखेड-59,349 
सावनेर-78,298 
कळमेश्वर-51,187 
कामठी-93,781 
हिंगणा-92,040 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:  Students will get books on the first day