ऑनलाईन शिक्षण... अस्थिर मन, आजारी तन, स्क्रिन ॲडिक्शनचा धोका

संदीप भुयार
Wednesday, 7 October 2020

२६ जूनपासून यंदा प्रत्यक्ष शाळा सुरू होऊ शकल्या नाही. त्यामुळे शासनाने ऑनलाईन शिक्षणाला परवानगी दिली़. आता शाळांनी त्यासाठी तयारी करून दररोज अध्यापन केले जात आहे़. ज्या विद्यार्थ्यांच्या घरात अॅन्ड्राईड मोबाईल नव्हता़, त्या पालकांनी तजवीज करुन मोबाईल घेतला़. मात्र आता ठराविक कलावधीत होणाऱ्या ऑनलाईन शालेय तासिकांच्या व्यतिरिक्तही विद्यार्थी दिवस-दिवसभर मोबाईलचा नाद सोडायला तयार नाही. 

कळमेश्वर (जि.नागपूर) : संकटातून मार्ग शोधण्याची क्षमता माणसात निर्माण करणे, हेच शिक्षणाचे खरे ध्येय. सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी याच ध्येयासक्तीतून शाळा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकविण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहे. मात्र घरातून बसून मोबाईलवर शिकणारे विद्यार्थी शिक्षणाशिवाय केवळ मोबाईच्याच प्रेमात आकंठ बुडाल्याचे चित्र आहे़  तासनतास मोबाईलकडे पाहण्याने लहानग्यांच्या शरीरावर आणि मनावरही विपरित परिणाम होत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

अधिक वाचाः सूरताल झाले बेताल, जादू झाली छूमंतर, कलेला लागली कोरोनाची नजर
 

‘मोबाईलवेड’ पक्के करण्यासाठी सध्याची परिस्थिती कारणीभूत
२६ जूनपासून यंदा प्रत्यक्ष शाळा सुरू होऊ शकल्या नाही. त्यामुळे शासनाने ऑनलाईन शिक्षणाला परवानगी दिली़. आता शाळांनी त्यासाठी तयारी करून दररोज अध्यापन केले जात आहे़. ज्या विद्यार्थ्यांच्या घरात अॅन्ड्राईड मोबाईल नव्हता़, त्या पालकांनी तजवीज करुन मोबाईल घेतला़. मात्र आता ठराविक कलावधीत होणाऱ्या ऑनलाईन शालेय तासिकांच्या व्यतिरिक्तही विद्यार्थी दिवस-दिवसभर मोबाईलचा नाद सोडायला तयार नाही.  तास-अर्धा तासाचे ऑनलाईन शिक्षण झाल्यानंतरही मुले मोबाईल गेम खेळत असतात. तज्ज्ञांच्या मते ही बाब त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर आघात करीत आहे. सध्या ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्याय नसला तरी मुलांचे ‘मोबाईलवेड’ पक्के करण्यासाठी सध्याची परिस्थिती कारणीभूत ठरत आहे.

हेही वाचाः हिंगणा एमआयडीसीत चालते श्रमिकांच्या घामावर ठेकेदारांची सावकारी

मोबाईलचे दुष्परिणाम
आठवड्यातून २० तासापेक्षा अधिक मोबाईल हाताळल्यास ते अॅडीक्शन होय. मोबाईलच्या सतत वापराने मुलांच्या डोळयावर परिणाम होत असून ते अॅम्लोफिया आजाराचे बळी ठरत आहे़त. झोप लागण्याचे प्रमाण घटत आहे़. मोबाईलमध्ये गुंतल्याने इतरांशी संपर्क कमी झाला असून त्यातून ताणतणाव वाढत आहे. मुलांमध्ये चिडचिडेपणा, रागावणे, भांडणे यासारखी प्रवृत्ती वाढत आहे. ऑनलाईन शिक्षणादरम्यान विद्यार्थी शिस्त पाळत नाही़. अनेक जण तासिका रेकॉर्ड करून आपल्या सोईप्रमाणे ऐकण्याचा बहाण करतात़. ऑफलाईन शिक्षणाप्रमाणे यात विद्यार्थी- शिक्षक यांचा संवाद निट होत नसल्याने मुलांचा मानसिक विकास हवा तसा होत नाही.

अधिक वाचाः हिंगणा एमआयडीसीत डंम्पिंग यार्डसाठी कुणी जागा देता का जागा !
 

पालकांनी हे करावे उपाय-
मुलांना मोबाईल वापरण्यासाठी वेळेची मर्यादा घालून द्यावी़, ही वेळ दोन तासापेक्षा अधिक नसावी. ते वेळ पाळतात का यावर लक्ष ठेवावे़. ऑनलाईन पध्दतीने कधीही शिक्षण शक्य असले तरी रविवारी जाणीवपूर्वक मुलांना सुटी दिलीच पाहिजे़. ऑनलाईन तासिकेमध्ये दहा ते पंधरा मिनिटांचा रेस्ट घ्यावाच़ . सध्या मुलांना इतरत्र फिरता येत नसले तरी त्यांना नृत्य, गायन, वादन अशा ‘इनडोअर’ प्रकारात गुंतवावे.

ऑनलाईन शिकवणी वर्गाचाही ताण
शालेय अभ्यासक्रमासोबतच खासगी शिकवणी वर्गही ऑनलाईन पध्दतीने सुरू आहे. बहुतांश विद्यार्थी शालेय अभ्यासक्रमापेक्षाही अधिक शिकवणी वर्गांच्या क्लासेसला ऑनलाईन हजेरी लावत आहेत.  त्यामुळे विद्यार्थ्यांचा ‘स्क्रिन टाईम’ अधिकच वाढत आहे. शासनाने वयोगटानुसार ऑनलाईन क्लासेससाठी वेळेची मर्यादा घालून दिली आहे. मात्र खासगी शिकवणी वर्गामुळे ही मर्यादा ओलांडली जात आहे. पालकांनी याबाबतही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

संपादनः विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ऑनलाईन शिक्षण... अस्थिर मन, आजारी तन, स्क्रिन ॲडिक्शनचा धोका