"त्या' व्हिडिओप्रकरणी जाणून घ्या उपराजधानीतील धक्‍कादायक वास्तव...

अनिल कांबळे
Tuesday, 9 June 2020

देशात संचारबंदी आणि लॉकडाऊन असल्याने पॉर्न वेबसाईट्‌सवर व्हिजिट करणाऱ्यांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. तसेच वेबवाईटवरून पॉर्न डाऊनलोड करणे आणि सोशल मीडियाद्वारे शेअर करणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे.

नागपूर : जवळपास प्रत्येकाच्या हातात असलेला स्मार्टफोन आणि स्वस्त असलेल्या इंटरनेटमुळे अल्पवयीनांसह तरुण-तरुणी पॉर्न व्हिडिओंची देवाण-घेवाण करण्यामध्ये एक्‍स्पर्ट झाले आहेत. उपराजधानीत गेल्या दीड वर्षात पॉर्न व्हिडिओ पाठविणे किंवा अश्‍लील फोटो पाठविण्यासंदर्भात तब्बल 53 गुन्हे दाखल झाले आहेत. या आरोपींमध्ये तरुणींचाही समावेश असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

देशात संचारबंदी आणि लॉकडाऊन असल्याने पॉर्न वेबसाईट्‌सवर व्हिजिट करणाऱ्यांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. तसेच वेबवाईटवरून पॉर्न डाऊनलोड करणे आणि सोशल मीडियाद्वारे शेअर करणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. सध्याच्या स्थितीत पॉर्न बेवसाईट्‌सवर जाऊन पॉर्न बघणाऱ्यांमध्ये मुली व महिलांचा टक्‍काही लक्षणीयरीत्या वाढला आहे.

यात अल्पवयीन मुलींचाही मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे अलीकडच्या काळातील काही सर्वेक्षणांतून स्पष्ट झाले आहे. महिला किंवा तरुणींना पॉर्न व्हिडिओ पाठविल्याच्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी गेल्या दीड वर्षांत 53 गुन्हे दाखल केले आहेत.

कौटुंबिक कलहातून तरुणाने उचलले हे टोकाचे पाऊल

यात तीन आरोपींनी स्वतःच्या प्रेयसीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करीत असताना मोबाईलने अश्‍लील व्हिडिओ आणि फोटो काढल्याच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. उपराजधानीत कॉलेजवयीन तरुण-तरुणींमध्ये पॉर्न व्हिडिओ पाहण्याची क्रेझ आहे. त्यामुळे अनेक वेबसाईट्‌सवरून व्हिडिओ डाऊनलोड करणे आणि व्हॉट्‌स ऍपच्या माध्यमातून शेअर करण्याचे प्रमाणही वाढले आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्यामुळे जवळपास 90 टक्‍के लोक घरीच आहेत. या कालावधीत अश्‍लील चित्रफिती आणि फोटोंसाठी प्रसिद्ध असलेल्या पॉर्न बेवसाईटवर युवावर्गासह वयोवृद्धांकडून होणाऱ्या सर्चिंगचे प्रमाण वाढले आहे. सर्चिंग हे प्रमाण जवळपास दुप्पट झाल्याचे दिसून आले. पॉर्नचा वाढता प्रसार पाहता नागपूर सायबर पोलिसांनी वॉच ठेवणे सुरू केले आहे. पॉर्नची सर्चिंग किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केल्यावर आयपीसीच्या 149, आयटी ऍक्‍टच्या सेक्‍शन 67 (अ,ब,क) नुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
 

गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले

सायबर क्राईमकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिवसेंदिवस पॉर्न बघणाऱ्यांची संख्या वाढल्याने अशा गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. व्हॉट्‌स ऍपमुळे अश्‍लील चित्रफितींची देवाण-घेवाणही वाढली. तसेच प्रेयसीचे अश्‍लील व्हिडिओ किंवा फोटो काढून ते सोशल मीडियावर पसरविण्याचे गुन्हेही वाढले आहे. उपराजधानीतील हे प्रमाण जवळपास दुप्पट आहे.

व्हॉट्‌स ऍप ग्रुपमधून ब्ल्यू फिल्म

16 ते 30 वयोगटातील मुली आणि महिला या व्हॉट्‌स ऍपवरून डाऊनलोड करून ब्ल्यू फिल्म पाहतात. काही तरुणी थेट ऑनलाईन व्हिडीओ पाहतात. काही शाळकरी आणि महाविद्यालयीन तरुणींचे विशेष व्हॉट्‌स ऍप ग्रुप असतात. ज्यामध्ये फक्‍त मैत्रिणी आणि कॉलेजच्या फ्रेंडस असतात. अशा ग्रुप्समधून मोठ्या प्रमाणात ब्ल्यू फिल्मची देवाणघेवाण होते.
 

कोणत्यावेळी कोण करते सर्च

तरुण मुले दुपारी बारा ते 4 आणि रात्री अकरा ते दोन वाजेपर्यंत सर्वाधिक पॉर्न वेबसाईट सर्च करतात. तर शाळकरी व महाविद्यालयीन मुली दुपारी एक ते चार आणि रात्री अकरा ते एक वाजेपर्यंत ब्ल्यू फिल्म पाहतात. वेगळी बेडरूम असलेल्या तरूणींमध्ये ब्ल्यू फिल्म पाहण्याचे प्रमाण जास्त आहे. तर महिला दुपारी एक ते तीन वाजेदरम्यान पॉर्न बघातात, अशी माहिती आहे.
 

ब्ल्यू फिल्म पाहणाऱ्यामध्ये अल्पवयीन

सायबर क्राईमकडून मिळालेल्या माहितीनुसार, पॉर्न व्हिडिओ पाहणाऱ्यांमध्ये 24 टक्‍के तरूणी ऑनलाईन पॉर्न साईट्‌स पाहतात. 3.8 टक्‍के तरूणी रोज मोबाईलमध्ये ब्ल्यू फिल्म पाहतात. तर 2.5 टक्‍के तरूणी अधून-मधून ऑनलाईन ब्ल्यू फिल्म पाहतात. तसेच 7.1 टक्‍के जेव्हा वेळ मिळाला तेव्हा मोबाईलवर अश्‍लिल चित्रिफिती किंवा फोटो पाहतात. तर 16 टक्‍के तरूणी थेट मोबाईलमध्ये डाऊनलोड करून ब्ल्यू फिल्म पाहतात.

वर्ष गुन्हे

  • 2019 : 31
  • 2020 : (जून) 22

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 53 crimes in porn video cases in the Nagpur