नितीन गडकरींच्या मते अर्थव्यवस्था मजबूत करण्यात हे मंत्रालय बजावणार चोख भुमिका 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जून 2020

देशाबद्दल कामाची कटिबद्धता असेल तरच आम्ही योग्य मार्गाने काम करू शकतो. चांगले काम करणाऱ्यांना नैतिक पाठिंबा दिला पाहिजे. अर्थविषयक मूल्यमापन झाले नाही तरी चालेल पण कामाच्या प्रगतीचे मूल्यमापन होणे गरजेचे असून, यासाठी माझा आग्रह असतो. असे नितीन गडकरी म्हणाले.

नागपूर : कोरोना संकटाने देशाला नवीन संधी उपलब्ध करून दिली. देशात नवीन अद्ययावत तंत्रज्ञान आणणे सुरू झाले आहे. आता जगभरातील उद्योजक उद्योगांसाठी भारताला प्राधान्य देत आहेत. अधिकारी आणि मंत्री ही संपूर्ण एक चमू म्हणून आम्ही काम करीत आहोत. निर्णय घेणारे अधिकारी मला आवडतात. वेळेत निर्णय आणि पारदर्शकता व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन याला माझे प्राधान्य असल्याचे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्‍त केले आहे. 

नितीन गडकरी म्हणाले, देशाबद्दल कामाची कटिबद्धता असेल तरच आम्ही योग्य मार्गाने काम करू शकतो. चांगले काम करणाऱ्यांना नैतिक पाठिंबा दिला पाहिजे. अर्थविषयक मूल्यमापन झाले नाही तरी चालेल पण कामाच्या प्रगतीचे मूल्यमापन होणे गरजेचे असून, यासाठी माझा आग्रह असतो. आता एमएसएमई स्टॉक एक्‍सचेंज आम्ही सुरू करणार आहोत. यातून भागभांडवल उभे राहील. याचा परिणाम सकारात्मकच दिसणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. 

वाचा : अकरावीचे ऑनलाईन प्रवेश नकोच, का होतेय ही मागणी...

एमएसएमई मंत्रालयाने आतापर्यंत 11 कोटी रोजगारांची निर्मिती केली. 48 टक्के निर्यात तर 24 टक्के ग्रोथ या मंत्रालयाची आहे. अर्थव्यवस्था मजबूत करण्यात या खात्याची महत्त्वाची भूमिका चोख असून 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आणि 100 लाख कोटींच्या पायाभूत सुविधा यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करून हे लक्ष्य पूर्ण करू असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: According to Nitin Gadkari, the ministry will play a key role in strengthening the economy