शहरानंतर आता ग्रामीण भागातील बाधितांची संख्या धडकी भरवणारी....

file
file

नागपूर ग्रामीणः नागपूर शहरानंतर आता जिल्हयातील ग्रामीण भागात  कोरोनाने चांगलेच हातपाय पसरविले आहेत. रुग्णसंख्या झपाट्याने वाढण्याची सुरूवात जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून झाली. आतापर्यंत बाधितांचा आकडा प्रचंड वेगाने वाढला. एकट्या कामठी तालुक्यात तर कोरोनाने कहरच केला. येथे बाधित रुग्णांची संख्या तर हजाराच्या वर गेली. पारशिवनी, कन्हान, कोदामेंढी यासारख्या शहरातही रुग्णांचे मृत्यू होण्यास सुरूवात झालेली आहे.   

कामठी ३४ पॉझिटिव्ह रुग्णांसह बधितांची संख्या हजाराच्या घरात
कामठी : तालुक्यातील हजाराजवळ पोहोचलेली रूग्णसंख्या धडकी भरवणारी आहे. शहर व ग्रामीण भागातील सर्वाधिक रूग्णसंख्या कामठी शहरातील आहे. सुरुवातीला नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सतरंजीपुरा व गांधीबाग या झोनचेही विक्रम या तालुक्याने मोडीत काढलेत. कोरोनाच्या मृत्यूमध्ये दररोज वाढ होत असतानाच आज मंगळवारी कामठी तालुक्यात ३४ पॉझिटिव्हसह तालुक्याची रूग्णसंख्या ९७६ वर तर मृत्युसंख्या ३८ वर पोहोचली आहे. आज ६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आजपर्यंत तब्बल ६३२ बाधित रुग्णांनी कोरोनावर मात करत कामठी तालुका प्रशासनाला सुखद दिलासा दिला आहे.

अधिक वाचा : पुराचे पाणीच रोखू शकत नाही, ती कसली बरे संरक्षक भिंत?

रामटेक तालुक्यात दोन पॉझिटिव्ह
रामटेकः तालुक्याने आज चाळीशी गाठली. शहरात आज दोन जण कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे शहराची रूग्णसंख्या २४ झाली असून ग्रामीणची १६, तालुक्याची संख्या ४० झाली आहे. रामटेकमध्ये आज महात्मा फुले वार्डात एक ३५ वर्षीय तरूण कोरोनाबाधित  आढळला. हा तरूण  नागपुरला एका आरोग्यकेंद्रात काम करतो. त्याच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात येत आहे. दुसरा ३० वर्षीय तरुण जो खुमारी येथील टोल नाक्यावर कामाला असून अंबाळा वार्डात राहतो.

अधिक वाचा  :  भयंकर! संपत्तीसाठी भाऊच उठला भावाच्या जीवावर!

कोदामेंढीत ९, मौद्यात १ पॉझिटिव्ह
मौदा कोदामेंढीः तालुक्यातील कोदामेंढी येथील ९  व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात वृद्ध, महिला व लहान मुलांचा समावेश आहे. एकाच गावात १४ पॉझिटिव्ह निघाले व दोघांचा बळी गेला. मौदा  येथील स्नेह नगर येथील एक  व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यात एकूण रुग्णसंख्या ५७ वर पोहचली आहे.  दोघांचा मृत्यू झाला. कोरोनामुक्त २८ झाले तर २७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे कोदामेंढी येथील २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. तिच्या संपर्कातील ४७ वर्षीय महिला व ७२ वर्षीय मृत्यू व्यक्तीच्या संपर्कातील ६५ वर्षीय महिला, ४२ वर्षीय महिला, ९ वर्षीय मुलगी व ५ वर्षीय मुलाचा आज अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे ७२ वर्षीय वृद्ध, १४ वर्षीय मुलगा, ९ वर्षीय मुलगा, ७ वर्षीय मुलगी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मौदा येथील स्नेहनगर येथे किरायाने राहत असलेल्या ३५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. कोदामेंढी येथील तरुणीचा व वृद्धाचा मृत्यू होताच  पॉझिटिव्हची संख्या झपाट्याने वाढत आहे.

कुही तालुक्यात आणखी दोन पॉंझिटिव्ह
कुहीः प्राथमिक आरोग्य केंद्र तितूर येथे आज रॅपिड अँटिजेंन चाचणी घेण्यात आली. एकूण ५० रुग्णांची चाचणी घेण्यात आली असता यात तितूर येथील १९ व २४ वर्षीय दोन युवक पॉंझिटिव्ह आढळून आले. त्यांना नागपूर येथे उपचारार्थ हलविण्यात आले. हे दोघेही नागपूर येथील हल्दीराम कंपनीत कामाला आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश गिलानी यांनी दिली.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक
टेकाडी: पारशिवनी तालुक्यातील गोंडेगाव ग्रामपंचायती अंतर्गत वेकोली वसाहतीमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. कांद्री स्थित कोविड केंद्रात घेण्यात आलेल्या रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये आज सहा कोरोनाबाधित आढळले. त्यामध्ये गोंडेगाव कॉलनी येथील ३६ वर्षीय युवकाचा समावेश असून कांद्री ७० वर्षीय महिला, कन्हान ३६ वर्षीय पुरुष, वाघदरे वाडी ४४ वर्षीय पुरुष, पिपरी ३८ वर्षीय पुरुष, कन्हान ५३ वर्षीय पुरुष तर पारशिवनी येथे झालेल्या टेस्टमध्ये पुण्यावरून आलेला ३२ वर्षीय युवक  बाधित आढळला आहे. सध्या तालुक्यातील रुग्णांची संख्या २०९ झाली असून मृतांची संख्या ६ आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण कन्हान शहरातील आहेत. वाढती रुग्णसंख्या बघता जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी कन्हान नगर  परिषदेत आढावा बैठक घेतली होती.

तालुक्यातील एकूण रुग्ण व मृतांची स्थिती                         


तालुका
एकूण बाधित     मृतांची संख्या
कामठी                 ९७६        ३८
पारशिवनी            २०९          
मौदा             ५७           

रामटेक
           ४०        0
कुही                 २६        0
भिवापूर                  ८        १
सावनेर                 २०५          २
काटोल          १५०     0
हिंगणा            १४५        ४

       संपादन  : विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com