परीक्षा घेताय मग, एक कोटीचा विमा काढा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जून 2020


राज्यातील विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टाहास काही संघटना करीत आहेत. मात्र, राज्यात करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जवळपास एकाही महाविद्यालयात परीक्षा घेणे शक्‍य नाही. विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अंतिम वर्ष महत्वाचे आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे आरोग्यही तेवढेच महत्वाचे असल्याचा दाखला देत, राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघातर्फे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागील वर्षातील मिळालेले पूर्ण गुण व या वर्षातील 50टक्के गुण देऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात यावे अशी मागणी केली आहे

नागपूर : राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. या निर्णयाविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाने भूमिका घेत, परीक्षा रद्द करावी अशी मागणी केली असून जर परीक्षा घ्यायचीच असल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला एक कोटीचा विमा कवच देण्याची मागणी निवेदनातून केली आहे.

राज्यातील विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टाहास काही संघटना करीत आहेत. मात्र, राज्यात करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जवळपास एकाही महाविद्यालयात परीक्षा घेणे शक्‍य नाही. विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अंतिम वर्ष महत्वाचे आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे आरोग्यही तेवढेच महत्वाचे असल्याचा दाखला देत, राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघातर्फे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागील वर्षातील मिळालेले पूर्ण गुण व या वर्षातील 50टक्के गुण देऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात यावे अशी मागणी केली आहे. याशिवाय बॅकलॉग विषयात विद्यार्थ्यांना मागील सेमिस्टरमधील प्राप्त झालेले पूर्ण गुण आणि या वर्षात 50 टक्के गुण देऊन त्यांना उत्तीर्ण करावे. असा निर्णय न झाल्यास विद्यार्थ्यांचे पुढील एक वर्ष वाया जाईल व त्यांना पुढील नोकरी व शिक्षणासाठी अर्ज करता येणार नसल्याचे महासंघाने स्पष्ट केले आहे. 

हेही वाचा : खासदार सुनील मेंढे यांची नियमानुसार चौकशी करा

याउपरही सरकारने निर्णय फिरवून परीक्षा घेण्याचा विचार केल्यास विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेता, त्यांना एक कोटीचे विमा कवच देण्याची मागणी महासंघाने केली आहे.
यासंदर्भात उपजिल्हाधिकारी खजांची यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे नागपूर जिल्हा अध्यक्ष निलेश कोढे, शहराध्यक्ष विनोद हजारे, नागपूर जिल्हा महासचिव रोशन कुंभलकर, सचिव शुभम वाघमारे, प्रणय पांढरे, चेतन काळे यांनी निवेदन सादर केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After taking the exam, take out an insurance