हिंद देश के निवासी सभी जन एक है

All the people of the Indian country are one
All the people of the Indian country are one

नागपूर : भारत माता की बगिया में,
नये नये फिर फूल खिलायें.
मधुर सुगंध बहा कर इनकी,
सारा जग फिर से महकायें.
अपने घर के सारे झगड़े,
आपस में मिल कर सुलझायें.
शक्ति एकता में कितनी है,
यह रहस्य सबको समझायें.
या कवितेप्रमाणेच जवळपास अकरा राज्यांतील विद्यार्थी एकतेचा संदेश देण्यासाठी नागपुरात एकवटले आहेत. विविध प्रांत, बोलीभाषा, संस्कृती वेगवेगळी असली, तरी त्यामधील एकतेची भावना राष्ट्रीय सेवा योजनेच्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरातून हे विद्यार्थी प्रदर्शित करीत आहेत.

सध्या देशात नागरिकता संशोधन बिलामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. देशात विविध ठिकाणी त्याबद्दल दोन गट निर्माण झाल्याचे दिसून येते. युवकांना या वातावरणाचा एकतेने सामना करण्याची गरज आहे. यातून युवक व क्रीडा मंत्रालय, राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या शिबिरामध्ये अकरा राज्यांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. या राज्यांमधून निवडक विद्यार्थ्यांनाच या शिबिरामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. भारतीय तरुणाईमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढविणे, तरुणाईच्या कलागुणांना वाव देत या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. योगासनाने सुरुवात होणाऱ्या या शिबिरात विद्यार्थ्यांना दिवसभर विविध प्रकारच्या उपक्रमांमध्ये सहभागी केले जाते. नागपूर शहर आणि यातील विविध ऐतिहासिक वास्तूंची ओळखही या माध्यमातून विद्यार्थ्यांना करून दिली जात आहे. यासह तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यां व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे दिले जाते आहेत. सायंकाळच्या सुमारात विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये प्रत्येक राज्याला वीस मिनिटांचा वेळ दिला जात असून यावेळात विद्यार्थी त्यांच्या राज्याच्या विविध कलाकृती सादर करीत आहेत. शुक्रवारी पोंडीचेरी राज्याच्या स्वयंसेवकांनी त्यांच्या राज्याचा कलाविष्कार सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. तर, गोवा राज्याच्या विद्यार्थीने चक्क तामिळनाडू वाद्याच्या तालावर नृत्यविस्कार सादर करीत एक अनोखा संदेश दिला. तर केरळ राज्यातील विद्याथ्रयांनी तेथील लग्नसंस्कृतिचे दर्शन आपल्या नृत्यातून घडविले. विद्यार्थ्यांच्या या कलागुणांना उपस्थित नागरिकांनी मने जिंकली. शिबिरामध्ये अकरा राज्यांतील रासेयोचे कार्यक्रम अधिकारीही सहभागी झाले आहेत. तर नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. केशव वाळके, डॉ. गोसावी, प्रकाश शुक्‍ला यासाठी परिश्रम घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com