अंबाझरी जैवविविधता उद्यान झाले ऑनलाइन 

राजेश रामपूरकर
Tuesday, 27 October 2020

नागपूर वन विभागातील हिंगणा वनपरिक्षेत्रात ७५० हेक्टर राखीव वन क्षेत्रामध्ये अंबाझरी जैवविविधता उद्यान पर्यटकांसाठी साकारण्यात आले आहे. या उद्यानाचे व्यवस्थापन संयुक्त वन व्यवस्थापन (नागरी क्षेत्र) समितीद्वारे करण्यात येत आहे.

नागपूर :  टाळेबंदीमुळे ऑनलाइनची संकल्पना रुजली. अनलॉकमध्ये उद्याने खुली झालेली असली तरी अद्यापही सर्वसामान्य नागरिक कामाशिवाय बाहेर निघणे टाळत आहे. अशा पर्यटकांना घरबसल्या ambazaribiodiversitypark. com या संकेतस्थळावर भेट देऊन अंबाझरी जैवविविधता पार्क उद्यानाची सफर करता येणार आहे. 

नागपूर वन विभागातील हिंगणा वनपरिक्षेत्रात ७५० हेक्टर राखीव वन क्षेत्रामध्ये अंबाझरी जैवविविधता उद्यान पर्यटकांसाठी साकारण्यात आले आहे. या उद्यानाचे व्यवस्थापन संयुक्त वन व्यवस्थापन (नागरी क्षेत्र) समितीद्वारे करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षात पर्यटकांना निसर्गोपचार, पिण्याचे पाणी, पार्किंग व्यवस्था, निसर्ग पाऊल वाट, स्वच्छता गृह आणि पर्यटकांच्या मार्गदर्शनासाठी माहिती फलक लावण्यात आलेले आहे.

ब्लू मून पाहण्याची शनिवारी संधी, यानंतर तीन वर्षांनी येणार योग

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता उद्यानात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. मात्र, स्थानिकांसह इतर शहरातील नागरिकांना या उद्यानांचा आनंद लुटता यावा म्हणून संकेतस्थळाची निर्मिती केलेली आहे. त्याचे लोकार्पण वनमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी उपवनसंरक्षक डॉ. प्रभूनाथ शुक्ल उपस्थित होते. जैवविविधता उद्यान हे ऑक्सिजन उद्यान म्हणून काम करेल असे मत व्यक्त केले. या उद्यानात २०० पेक्षा अधिक फुलपाखरांचे प्रकार आहेत. सायकलिगं, पक्षी निरीक्षण, किडस् झोनही सुरू करण्यात आलेले आहे. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambazari Biodiversity Park Goes Online