...अन्‌ पोलिसांनी घराजवळ जाउन माईकवरून पुकारले, कस्तुरी तोतडे घराबाहेर या !

रामटेक :   कस्तुरी तोतडे हिचा वाढदिवस साजरा करताना पोलिस.
रामटेक : कस्तुरी तोतडे हिचा वाढदिवस साजरा करताना पोलिस.
Updated on

रामटेक (जि.नागपूर) :  "कस्तुरी तोतडे घराबाहेर या' असे पोलिस वाहनावरील ध्वनिक्षेपकावरून ठाणेदार दिलीप देशमुख यांनी फर्मावले. कस्तुरीच्या मनात धस्स झाले. पोलिस कशासाठी बोलावत आहेत, असे प्रश्न मनात घेऊन कस्तुरीने दार उघडून अंगणात पाऊल ठेवले. तर बाहेर पोलिसच पोलिस दिसले. आईवडील, छोटी बहीण सर्वच कस्तुरीपाठोपाठ घराबाहेर पडले. कस्तुरीने काय झाले, साहेब असे विचारले आणि तिची नजर पोलिस वाहनाचे समोरील बोनटवर ठेवलेला केक दिसला आणि तिचा चेहरा आनंदाने फुलला. आज कस्तुरीचा जन्मदिवस! कठोर हृदयाच्या पोलिसी आवरणाआड लपलेला हा "माणुसकी'चा चेहरा पाहून कस्तुरीच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

ताफा निघाला घराकडे
सर्व देश लॉकडाउन आहे. जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. या परिस्थितीत वाढदिवस असला तर सर्वसामान्य नागरिक आपल्या मुलामुलींचे वाढदिवस कसे साजरे करतील? वडील विवेक तोतडे यांच्याशी बोलण्यातून ठाणेदारांच्या लक्षात आणले. गांधी चौकातून सहायक निरीक्षक निशा भुते, उपनिरीक्षक दत्ताप्रसाद शेंडगे, श्रीकांत हत्तीमारे, कोळेकर, चालक ठेंगडी, पोलिस कर्मचारी पटिये, पाटील व इतर सर्वजण समोर दोन तीन दुचाकीवरून पोलिस व वाहन असा सर्व लवाजमा तोतडे यांच्या घराकडे निघाला.

"सोशल डिस्टन्सिंग'चा वापर
घराजवळ पोहोचताच ठाणेदारांनी कस्तुरीला घराबाहेर येण्यास सांगितले. "सोशल डिस्टन्सिंग' ठेवून सर्व जण उभे झाले. कस्तुरीने केक कापला व आईवडिलांसह सर्वांनी कस्तुरीचा वाढदिवस साजरा केला. कस्तुरी ही नगरसेवक विवेक तोतडे यांची ज्येष्ठ कन्या असून ती आर्किटेक्‍चर अभियंता आहे. मुंबईला एका मोठ्या फर्ममध्ये ती कामाला आहे. लॉकडाउन पूर्वीच ती मुंबईवरून रामटेकला परतली होती. तिचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nagpur Crime
Nagpur Civic Issue
NMC MBBS Admission
NMRDA Land Acquisition
Marathi News Esakal
www.esakal.com