आता प्रवाशांना बेड रोल, कोरोना प्रतिबंधक किटही, या स्थानकावर केली सुविधा...

Anti-corona kits has started to sale on Nagpur railway station
Anti-corona kits has started to sale on Nagpur railway station

नागपूर : कोरोनाच्या संकटाला परतवून लावण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत नागपूरसह विभागातील आठ रेल्वेस्थानकांवर कोरोना प्रतिबंधक किट विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. किटसोबतच प्रवाशांच्या सुविधेसाठी कमी दरातील बेड रोलही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. खासगी कंपनीच्या सहकार्यातून या साहित्याची विक्री सुरू केली असून, अवघ्या 24 तासांमध्ये कराराची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

अभिनव कल्पनांच्या माध्यमातून महसूल वाढविण्यावर नागपूर विभागाने भर दिला आहे. त्यानुसार अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम नागपूर रेल्वेस्थानकावर सुरू करण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या काळात कोरोना विषाणूच्या संक्रमणाला परतवून लावू शकतील, अशा प्रकारच्या साहित्य विक्रीचे यापूर्वी चार करार करण्यात आले आहेत. त्याच शृंखलेत आता कोरोनाविरोधी किट विक्रीचे 'किऑक्‍स' स्थापन करण्यात आले आहे.

नागपूरसह अजनी, वर्धा, सेवाग्राम, धामणगाव, चंद्रपूर, बल्लारशा, बैतूल स्टेशनवर किऑक्‍स उभारण्यात आले आहेत. येथून विकल्या जाणाऱ्या कोरोना विरोधी किटमध्ये पीपीई किट, मास्क, फेस शिल्ड, हॅन्ड ग्लोव्ज, सॅनिटायझरची बॉटल असेल. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रवाशांना रेल्वेत बेडरोल देणे बंद करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना काहीशा गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

ही अडचण लक्षात घेता या किऑक्‍समधून बेड रोलही उपलब्ध करून दिले जातील. त्याची किंमत दोनशेच्या आत असेल. या उपक्रमासाठी पुण्याच्या मेसर्स मेडिकेअर सोल्युशन कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. बुधवारपासून (ता. 8) नागपूर रेल्वेस्थानकावर फलाट क्रमांक 2 व 3 मध्ये या किऑक्‍सचा शुभारंभही झाला. या किऑक्‍सवरून साहित्य घेणाऱ्यांची थर्मल तपासणी केली जाणार असून, ऑक्‍सिजनचे प्रमाणही तपासून मिळणार आहे. या उपक्रमातून रेल्वेला वार्षिक चार लाखांचे उत्पन्नही मिळणार आहे.

प्रवाशांचे हित लक्षात घेता नागपूर स्टेशनप्रमाणे अन्य ठिकाणीही ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार युद्धस्तरावर केवळ 24 तासांच्या आत कराराची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. समूह प्रसार रोखण्याच्या दृष्टीने करण्यात आलेला हा भारतीय रेल्वेतील पहिलाच करार आहे. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णार्थ पाटील, सहायक वाणिज्य व्यवस्थापक विजय थूल, वाणिज्य निरिक्षक ताराप्रसाद आचार्य यांच्या पुढाकारातून ही प्रक्रिया पार पाडण्यात आली.

संपादन : अतुल मांगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com