कुठे आत्महत्या तर कुठे मृत्यू ..नागपुरात हे चाललंय काय.. दोन दिवसात मृत्यू तांडव.. वाचा सविस्तर  

योगेश बरवड
Friday, 31 July 2020

कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती खराब असलेल्या काही लोकांनी आत्महत्या केल्याच्या घटना तर काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोन दिवसात विविध घटनांमध्ये तब्बल ११ जणांचा जीव गेला आहे.

नागपूर:  नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अशातच कोरोनाच्या काळात नोकरी नसल्यामुळे हाताला काम नसल्यामुळे अनेकांवर अक्षरशः दुसऱ्यांसमोर हात पसरण्याची वेळ आली आहे. तर मजूर, रिक्षावाले आणि हात कामगार यांच्यावर तर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र गेल्या दोन दिवसात नागपुरात मृत्यू तांडव बघायला मिळाले आहे. 

कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती खराब असलेल्या काही लोकांनी आत्महत्या केल्याच्या घटना तर काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोन दिवसात विविध घटनांमध्ये तब्बल ११ जणांचा जीव गेला आहे. रिक्षाचालकासह दोन वृद्धांनी आत्महत्या केली. सीताबर्डी, एमआयडीसी, कोराडी, सदर, जरीपटका, प्रतापनगर, पाचपावली, लकडगंज, पारडी, हिंगणा, शांतीनगर हद्दीत या घटना घडल्या आहेत.  

हेही वाचा - आम्हालाही क्वारंटाइन करा असे विनंतीपत्र दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी का दिले जाणून घ्या...

कुठे आत्महत्या तर कुठे मृत्यू

 • एमआयडीसी हद्दीतील अमरनगरातील रहिवासी भीमराव मेश्राम (५५) यांनी राहत्या घरी छताच्या लाकडी बल्लीला नायलॉनच्या दोरीने बांधून गळफास लावून घेतला. बुधवारी रात्री ही घटना उघडकीस आली. भीमराव सायकल रिक्षाचालक होते. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी मिळणेच बंद झाल्याने ते आर्थिक संकटात सापडले होते. याच विवंचनेमुळे गेल्या काही दिवसांपासून तणावात राहत असल्याची माहिती आहे. 
   
 • शिवनगर, खामला येथील रहिवासी मधुकर बावणे (७५ ) यांनी घरी छताच्या लोखंडी पाईपला नाड्याने बांधून घेतला. गुरुवारी दुपारी ३.१३ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. 
   
 • वैशालीनगरातील रहिवासी कमल तभाने (८२) यांनी १८ जुलै रोजी स्वतःला पेटवून घेतले. गंभीररित्या होरपळल्याने त्यांना उपचारासाठी मेडीकल रुग्णालयात दाखल करण्यात होते. गुरुवारी सायंकाळी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
   
 • टेकडी गणेश मंदिर, उड्डानपुलाखाली ११ जुलै रोजी अनोळखी व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळून आला होता. त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान बुधवारी रात्री डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. 
   
 • कोराडी हद्दीत संभाजीनगर येथील खंडेलवार गोडाऊनसमोर गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता अनोळखी ६० वर्षीय व्याक्ती मृतावस्थेत आढळून आला. 
   
 • न्यू कॉलनी, मंगळवारी बाजार येथीर राहिवासी ऋषी सुभाष डकाह (27) याची प्रकृती गुरुवारी सकाळी अचानक खालावली. त्याला उपचाराकरीता मेयो हॉस्पीटल येथे भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान दुपारी ३.२० वाजता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. 
   
 • कुशीनगर, साई मंदिर येथील रहिवासी क्रिष्णकांत सांगोडकर (49) यांची प्रकृती गुरुवारी सकाळी अचानक खालावली. उपचारासाठी मेयो हॉस्पीटल येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. 

जाणून घ्या - 'माझ्याकडे लग्नाचा पुरावा आहे, तुझे लग्न दुसऱ्यासोबत होऊ देणार नाही' अस म्हणत केला अत्याचार...

 • लकडगंज हद्दीतील आंबेडकर चौकात बुधवारी सकाळी ९ वाजता अंदाजे 50 वर्षे वयोगटातील अनोळखी व्यक्ती बेशुध्दावस्थेत मिळून आला. त्याला उपचारासाठी मेयो हॉस्पीटल येथे भरती केले असता उपचारादरम्यान गुरुवारी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
   
 • भवानीनगर, मराठा चौकातील रहिवासी कमलाबाई गोमकर (52) यांची प्रकृती गुरुवारी रात्री खराब झाल्याने उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. 
   
 • रायपूरच्या हनुमाननगर झोपडपट्टी येथील रहिवासी दुर्गा मनोहर कापसे (40) यांना सार्पदंश झाल्याने उपचारासाठी हिंगणा ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. 
   
 • गुरुवारी रात्री कावरापेठ येथे ३५ वर्षे वयोगटातील व्याक्ती मृतावस्थेत आढळून आला. संबंधित पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत पुढील तपास सुरू केला आहे. 

 

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: atleast 11 people has no more in nagpur in last two days