कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्भवती मातांसाठी असावी ही सुविधा...

केवल जीवनतारे
मंगळवार, 2 जून 2020

नागपूर शहराचा विचार करता महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार उपराजधानीत 5 हजार 400 वर गर्भवती महिलांची नोंद दोन महिन्यांपूर्वी झाली होती. ती आता 6 हजारांच्या घरात असेल.

नागपूर : बालरोग तज्ज्ञांसह स्त्री व प्रसूतीरोग तज्ज्ञांशी संपर्क साधला असता, बाह्यरुग्ण विभागातील गर्दी हरवली असली तरी कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी रुग्णांशी "ऑनलाईन' संवाद साधला जात असल्याची माहिती त्यांच्याकडून मिळाली. परंतु ग्रामीण भागातून येणाऱ्या गर्भवती माता 12 आणि 19आठवड्यांच्या कालावधीत होणाऱ्या सोनोग्राफीपासून वंचित राहिल्या आहेत. शहरातील माताही कोरोनाच्या भीतीने घरातच आहेत. अशावेळी वस्तीमध्ये गर्भवती मातांच्या घराजवळ मोबाईल फिरत्या आरोग्य पथकाची गरज आहे.

नागपूर शहराचा विचार करता महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार उपराजधानीत 5 हजार 400 वर गर्भवती महिलांची नोंद दोन महिन्यांपूर्वी झाली होती. ती आता 6 हजारांच्या घरात असेल. तर नागपूर ग्रामीण भागात 4 हजारांवर असल्याची माहिती आशांमार्फत पुढे आली आहे. या कोरोनामुळे अनेक गर्भवती मातांचे घरातून निघणे अशक्‍य झाले.

पत्नीने केली पतीची हत्या आणि मुलाने फोडली बापाच्या खुनाला वाचा

शहरातील 37 वस्त्या "सील' करण्यात आल्या आहेत. या वस्त्यांमध्येही गर्भवती माता आहेत. तर मेयो आणि मेडिकलमध्ये कोरोना वॉर्डात प्रसूत झालेल्या मातांची तसेच कोरोना बाधित असल्याने दाखल झालेल्यांची संख्या डझनभर आहे. यामुळे अशा गर्भवती मातांसाठी घरातच राहाणे ही मोठी जोखीम आहे.

ऑनलाईन गरिबांच्या काय कामाचे?

शहरातील एका प्रसूती रोग तज्ज्ञांशी संपर्क साधला असता, शहरातील जवळजवळ सर्वच स्त्री व प्रसूतीरोग तज्ज्ञांनी आपआपल्या रुग्णांचा व्हॉट्‌स ऍप ग्रुप तयार केला आहे. प्रत्येक दिवसाचे अपडेट्‌स रुग्ण डॉक्‍टरांना कळवतात. औषधं घेण्यापासून तर आहार कोणता घ्यायचा, व्यायाम कसा करायचा हा सर्व सल्ला देण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.मात्र, झोपडपट्टीत राहणाऱ्या, दूरवर गावखेड्यात राहणाऱ्या गरीब गर्भवती मातेपर्यंत पोहचण्यासाठी व्हॉट्‌स ऍप काय कामाचे. त्यांना प्रत्यक्ष मेडिकल, मेयोत आल्यानंतरच उपचार घेण्याचे माहिती आहे.
 

आरोग्य विभागातील फिरते पथक थांबले?

सार्वजनिक आरोग्य विभागाचे एक फिरते पथक आहे. मात्र, सध्यातरी या फिरत्या पथकाच्या रुग्णवाहिकेची चाके जागच्या जागी थांबली आहेत. मात्र, या फिरत्या पथकाचे काम मर्यादित आहे. नेत्ररोग शिबिराच्या पुढे या पथकाचे काम नसल्याचे दिसते. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी मोबाईलवरून संपर्क साधला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the background of the corona Mobile squad for pregnant mothers