esakal | महसूलमंत्री थोरात म्हणाले, कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात असून प्रलंबित महसुली कामांना गती द्या
sakal

बोलून बातमी शोधा

balasaheb thorat says Accelerate pending revenue works

पालकमंत्री नितीन राऊत यांनी देखील कोरोनाच्या संभाव्य लाटेस तोंड देण्यासाठी आरोग्य व्यवस्था सज्ज असल्याचे सांगितले. विभागातील पीक पाणी, पूर परिस्थितीचे निधी वाटप, झुडपी जंगलाविषयी ही माहिती घेतली. नागपूर विभागातील सातबारा संगणकीकरण ९९ टक्के पूर्ण झाले ही समाधानाची बाब आहे.

महसूलमंत्री थोरात म्हणाले, कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात असून प्रलंबित महसुली कामांना गती द्या

sakal_logo
By
नीलेश डोये

नागपूर : कोरोनाच्या प्रकोपामुळे दैनंदिन जीवनासह शासकीय कामकाजही मधल्या काळात प्रभावित झाले. आता कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात असून कोरोना काळातील प्रलंबित महसुली कामांना गती देण्याचे निर्देश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे.

थोरात यांनी प्रारंभी नागपूर विभागातील कोरोनाची माहिती जाणून घेतली. विभागातच नव्हे तर राज्यातील कोरोना संसर्गाचा वेग व मृत्यू कमी झाले आहे. तरीही गाफील राहून चालणार नाही. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यादृष्टीने आरोग्ययंत्रणेसोबतच प्रशासनाने सतर्क असावे, असे ते म्हणाले.

अधिक वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले

पालकमंत्री नितीन राऊत यांनी देखील कोरोनाच्या संभाव्य लाटेस तोंड देण्यासाठी आरोग्य व्यवस्था सज्ज असल्याचे सांगितले. विभागातील पीक पाणी, पूर परिस्थितीचे निधी वाटप, झुडपी जंगलाविषयी ही माहिती घेतली. नागपूर विभागातील सातबारा संगणकीकरण ९९ टक्के पूर्ण झाले ही समाधानाची बाब आहे. मात्र, जमीन अकृषी करण्याची नियमावली सोपी करण्याबाबत महसूल विभागातील अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात.

वाळू लिलाव, प्रलंबित फेरफार नोंदी, महाराजस्व अभियानात केलेली काम, राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन मोबदला आदींबाबत ही अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. बैठकीला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, उपायुक्त सुधाकर तेलंग, उपायुक्त मिलिंद साळवे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांची, निशिकांत सुके, अविनाश कातडे, रवींद्र कुंभारे उपस्थित होते.

संपादन - नीलेश डाखोरे

go to top