कोरोना सोडविणार रिक्त जागांचे गणित...कसे ते वाचा

मंगेश गोमासे
रविवार, 31 मे 2020

मार्च महिन्यापासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामध्ये महाराष्ट्रात पुणे, मुंबईमध्ये त्याचा प्रादुर्भाव अधिक आहे. अशा परिस्थितीत या ठिकाणच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या मनस्थितीत पालक सध्या दिसून येत नसल्याचे समजते. त्यामुळे एमएचसीईटनंतर पालकही विदर्भातील अभियांत्रिकी महाविद्यालयांनाच पसंती देतील अशी आशा आहे. 

नागपूर : गेल्या काही वर्षात विदर्भातील अभियांत्रिकीसह तंत्रनिकेतन आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या जवळजवळ निम्म्या जागा रिक्त संकट महाविद्यालयांवर होते. यावर्षी मुंबईसह पुण्यात कोरोनाचे संकट अधिकच गंभीर असल्याने पालकांकडून पाल्यांना या शहरात पाठविण्यावर विचार सुरू आहे. या संधीचा फायदा विदर्भातील व्यावसायिक अभ्यासक्रमातील महाविद्यालयांना होण्याची शक्‍यता असून येथील रिक्त जागा मोठ्या भरण्याची चिन्हे आहेत. 

अभियांत्रिकी, व्यवस्थापन, पॉलिटेक्‍निक यासह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशासाठी पुणे, मुंबई ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असते. त्यामुळे एमएच-सीईटीसह इतर प्रवेश पात्रता परीक्षांचे निकाल लागताच, विद्यार्थी प्रवेशासाठी पुणे, मुंबईच्या दिशेन पळतात. पालकांकडून या ठिकाणच्या महाविद्यालयात प्रवेशासाठी डोनेशन देण्याची तयारी असते. याचाच परिणाम म्हणून गेल्या सहा ते सात वर्षांपासून विदर्भातील महाविद्यालयांवर रिक्त जागांचे संकट ओढविलेले आहे. त्यामुळे यावर्षीही जवळपास अशीच परिस्थिती असेल अशी संस्थाचालकांसह शिक्षक आणि प्राचार्यांची मानसिकता होती. 

मार्च महिन्यापासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामध्ये महाराष्ट्रात पुणे, मुंबईमध्ये त्याचा प्रादुर्भाव अधिक आहे. अशा परिस्थितीत या ठिकाणच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या मनस्थितीत पालक सध्या दिसून येत नसल्याचे समजते. त्यामुळे एमएचसीईटनंतर पालकही विदर्भातील अभियांत्रिकी महाविद्यालयांनाच पसंती देतील अशी आशा आहे. 

नागपूर आणि विदर्भात नोकरीच्या बऱ्याच संधी आहेत. बरीच नामवंत महाविद्यालये आहेत. शिवाय अनेक उद्योजक येथे उद्योग सुरू करण्यास उत्सुक असल्याने आता विद्यार्थ्यानी पुण्यामुंबईकडे न वळता येथेच प्रवेश घेत संधीचे सोने करावे. 
-डॉ. आमिषी अरोरा, संचालक, 
सेट्रल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट रिसर्च ऍन्ड डेव्हलमेंट 
 

कोरोनाचा विळखा लक्षात घेता पुढे आता पुण्याला जाणे अवघड वाटते आहे. माझा मुलगा पुण्याला शिकतो. मात्र, हे संकट केव्हा संपेल हे अद्याप निश्‍चित दिसून येत नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे. 
-अनिता शिंदे, पालक 

हेही वाचा : माकड दोन दिवस होते विहिरीत पडून; शेतकऱ्याने घातले खाऊपिऊ... वाचा पुढे 

कोरोनामुळे पुढील परिस्थिती कशी राहील यावरुन प्रवेशाबाबत विचार करावा लागेल. मात्र, सध्या येथीलच एखाद्या चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करेल. 
-अमोघ चव्हाण, विद्यार्थी. 

शाखा -         महाविद्यालयांची संख्या      - जागा           -रिक्त जागा 
अभियांत्रिकी     - 48                              -20,000           -12,000 
पॉलिटेक्‍निक     - 64                             -17,684           - 13,940 
एमबीए            - 35                             -10,000           -2041 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Benefite colleges of vocational courses