कोरोनाची अशीही कमाल, आले सॅनिटायजर विकायला आणि ...

HandSanitizer
HandSanitizer

नागपूर : कोरोनाच्या दहशतीत शहरात सॅनिटायजरचा तुडवडा असताना कालबाह्य झालेल्या सॅनिटायजरची विक्री करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विक्की जयरामदास खानचंदानी (वय 40) व त्याचा साथीदार जितेंद्र जयकिशन मुलानी (42, दोन्ही रा.जरीपटका) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धोकादायक असलेल्या कोरोना या व्हायरसची लागण होऊ नये म्हणून आरोग्य विभागाकडून सॅनेटायझरचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे बाजारात त्याची टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न दोघांनी केला. शुक्रवारी सायंकाळी 6.30 वाजता आरोपी विकी खानचंदानी आणि जितेंद्र मुलानी ( दोघेही रा. जरीपटका) हे उडीबाबा चौकात असलेल्या मेडिकल स्टोअर्समध्ये सॅनेटाईझरच्या बाटल्या घेऊन विक्रीकरीता आले. त्यावेळी त्यांनी मेडिकल शॉपच्या मालकाला विश्वासात घेऊन निकृष्ट व भेसळयुक्त दर्जाचे सॅनेटायझर कमी किंमतीत विकण्याकरीता आणल्याचे सांगितले.

मेडिकल शॉपमालकाने कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांना पकडून ठेऊन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून बॅक्‍टर जर्म्स शिल्ड हॅण्ड सॅनेटायझर कंपनीच्या 15 हजाराच्या 10 नग बाटल्या आणि बॅक्‍टर जर्म्स शिल्ड हॅण्ड सॅनेटायझर कंपनीच्या 80 रुपयांच्या 2 नग बाटल्या आणि 5 हजारांचा एक मोबाईल असा एकूण 20 हजार 080 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपींनी भेसळयुक्त द्रव्य बाटलीमध्ये भरून त्यावर बोगस लेबल लाऊन एक्‍सपायरी डेट बदलवून जास्त किंमतीने विकून नागरिकांच्या जीवास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे

. ही कारवाई एमआयडीसीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंतकुमार खराबे, राजेश पुकळे, पीएसआय देवानंद बगमारे, मंगेश गवई, अमोल ठाकरे आणि विक्‍की मेश्राम यांनी केली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com